Ahmednagar News : अहमदनगर हा भौगोलिक दृष्ट्या पुण्यानंतर सर्वाधिक मोठा जिल्हा. सहकार क्षेत्रात अहमदनगर जिल्ह्याचे मोलाचे योगदान आहे. हा जिल्हा महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासात कायमच अग्रेसर राहिला आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या शिरेपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे. नुकतेच टी फोर एज्युकेशन या संस्थेने जगभरातील सर्वोच्च दहा प्रेरणादायक आगळ्यावेगळ्या शिक्षण संस्थांची निवड केली आहे.
या निवड झालेल्या शैक्षणिक संस्थांपैकी सर्वोच्च शाळांना आता पुरस्कार दिला जाणार आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील एका शैक्षणिक संस्थेच्या शाळेची देखील निवड झाली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, टी फॉर एज्युकेशन या संस्थेने जाहीर केलेल्या जगभरातील टॉप 10 प्रेरणादायक आणि आगळ्यावेगळ्या शाळांमध्ये भारतातील पाच शाळांची निवड झाली आहे.
तसेच या पाच शाळांमध्ये तीन शाळा या महाराष्ट्रातील आहेत. ही महाराष्ट्रवासी म्हणून आपल्या सर्वांसाठी गर्व करण्यासारखी बाब आहे. महाराष्ट्र व्यतिरिक्त गुजरात आणि दिल्लीमधील प्रत्येकी एक-एक शाळेचा समावेश यामध्ये आहे. महाराष्ट्रातील तीन शाळांपैकी एक शाळा ही अहमदनगर येथील आहे. अहमदनगर जिल्ह्यातील स्नेहालय संस्थेच्या शाळेचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय या सर्वोच्च शाळेच्या पुरस्कारासाठी निवड झालेल्या शाळेत दिल्लीतील सरकारी स्कूल नगर निगम प्रतिभा बालिका विद्यालय, मुंबईतील ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूल, गुजरातमधील रिव्हरसाइड स्कूल, दादरमधील शिंदेवाडी मुंबई पब्लिक स्कूल या शाळेचा देखील समावेश आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण टी फॉर एज्युकेशन संस्थेने टॉप 10 शाळांमध्ये अहमदनगरच्या या शाळेचा समावेश केला या शाळेची नेमकी विशेषता काय? याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. तसेच टी फोर एज्युकेशन संस्थेने निवडलेल्या या टॉप 10 शाळांना कोणता लाभ संस्थेच्या माध्यमातून पुरवला जाणार आहे याबाबतही जाणून घेणार आहोत.
स्नेहालय शैक्षणिक संस्थेची विशेषता काय
अहमदनगर येथील स्नेहालय शैक्षणिक संस्था शिक्षणापासून वंचित राहिलेल्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण पुरविण्याचे काम करत आहे. ही संस्था रेड लाईट एरिया मधील मुले, एचआयव्ही बाधित मुले, कैद्यांची मुले, बालकामगार, लैंगिक शोषणास बळी पडलेले मुले आणि झोपडपट्टीतील मुलांना शिक्षण देण्याचे कौतुकास्पद कार्य करत आहे.
समाजातील या शिक्षणापासून वंचित राहत असलेल्या घटकांना शिक्षित करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे पुण्याचे काम ही संस्था करत आहे. असं सांगितलं जातं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, या दुधाचे जो सेवन करतो तो निश्चितच शूरवीर बनतो. यामुळे शिक्षण पुरवणे हे राज्याचे कर्तव्य आहे. यासाठी शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
शिक्षणाला मूलभूत हक्काचा दर्जा देखील प्राप्त आहे. मात्र राज्य शासना व्यतिरिक्त स्नेहालय संस्थेप्रमाणेच इतर बहुउद्देशीय संस्था देखील गोरगरीब आणि वंचित विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याचे कार्य करत आहेत. या कार्याचा गौरव व्हावा म्हणून नुकतेचे टी फॉर एज्युकेशन संस्थेने जगातील टॉप 10 शाळांची निवड केली असून अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेच्या शाळेचा देखील यामध्ये समावेश झाला आहे.
पुरस्काराचे स्वरूप कसे राहणार?
जगातील सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार हे 5 श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. या पाच श्रेणींसाठी या शाळांची निवड करण्यात आली आहे. यात समुदाय सहयोग, पर्यावरण कृती, नवीन उपक्रम, प्रतिकूलतेवर मात करणे आणि निरोगी जीवनाला समर्थन देणे यांचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्काराच्या माध्यमातून तब्बल अडीच लाख डॉलरचे बक्षिस दिले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जगातील सर्वोत्कृष्ट शाळांच्या यादीत विविध कॅटेगरीतून 10 शाळा निवडण्यात आल्या आहेत.
यात प्रत्येक कॅटेगरीतील 3 शाळांची घोषणा या पुरस्कारातून करण्यात येणार आहे. सप्टेंबरमध्ये ही घोषणा होईल आणि यानंतर मग विजेत्यांची घोषणा ऑक्टोबरमध्ये केली जाणार आहे. यामध्ये मग पाच कॅटेगरींनुसार पाच पुरस्कार मिळणार आहेत. म्हणजे अडीच लाख अमेरिकन डॉलर एवढी बक्षीसाची रक्कम पाच शाळांना समान वाटून देण्यात येणार आहे. म्हणजेच प्रत्येक शाळेला 50 हजार डॉलर इतकी रक्कम मिळणार आहे.