Ahmednagar Onion Rate : सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी वीस हजार टन कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे. श्रीलंका आणि UAE या दोन्ही देशांना प्रत्येकी दहा हजार टन कांदा निर्यात केली जाणार आहे. खरे तर सध्या संपूर्ण देशात निर्यात बंदी लागू आहे. डिसेंबर 2023 मध्ये निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आला होता.
31 मार्च 2024 पर्यंत निर्यात बंदी कायम राहणार होती. मात्र 31 मार्चनंतरही किरकोळ बाजारातील किमती नियंत्रणात रहाव्यात यासाठी सरकारने निर्यात बंदी ला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
दरम्यान हा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने पाच लाख टन कांदा खरेदी करणार असे जाहीर केले आहे. याशिवाय आता श्रीलंका आणि यु ए इ या देशांना वीस हजार टन कांदा निर्यातीचे धोरण अंगीकारले गेले आहे.
मित्र देशांना निर्यात बंदी लागू असताना सरकारच्या माध्यमातून 20,000 टन कांदा पाठवला जाणार आहे. मात्र या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होत नाहीये. यामुळे सरकारने ताबडतोब निर्यात बंदी हटवली पाहिजे अशी मागणी होत आहे.
दरम्यान आज आपण 20000 टन कांदा निर्यातीस परवानगी दिल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर एपीएमसी मध्ये कांद्याला काय भाव मिळत आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
अहमदनगर मध्ये कांद्याला काय भाव मिळतोय?
जिल्ह्यातील श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी अर्थातच 24 एप्रिल 2024 ला गावरान कांद्याची चार हजार तीनशे गोणी आवक झाली. यामध्ये उत्तम प्रतीच्या कांद्याला 1700 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
यात प्रथम श्रेणीच्या कांद्याला एक हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल ते एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. द्वितीय श्रेणीच्या कांद्याला 900 ते 1300 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
तृतीय श्रेणीच्या कांद्याला दोनशे ते नऊशे रुपये प्रति क्विंटल यादरम्यान भाव मिळाला आहे आणि गोल्टी कांद्याला बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. दुसरीकडे काल एपीएमसी मध्ये मोकळ्या कांद्याची 52 वाहनांमधून आवक झाली.
यात चांगल्या कांद्याला 1050 ते 1280 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. द्वितीय श्रेणीच्या कांद्याला 800 ते 1050 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. तृतीय श्रेणीचा कांदा 500 ते 800 रुपये प्रति क्विंटल या दरात विकला गेला आहे.
तसेच गोल्टी कांद्याला एक हजार रुपये प्रति क्विंटल ते 1150 रुपये प्रति क्विंटल असावा मिळाला आहे. म्हणजेच गोण्यातल्या कांदा महाग विकला गेला आहे. परंतु मोकळ्या कांद्याला हमाली, टोलाई आणि वाहतूक खर्च लागत नाही परिणामी मोकळ्या कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.