Superb Business Idea:- नोकऱ्यांची उपलब्धता कमी असल्याने आणि सुशिक्षित बेरोजगार तरुण आता व्यवसायांकडे वळताना आपल्याला दिसून येतात. परंतु व्यवसायांच्या बाबतीत देखील अनेक तरुणांचा व्यवसायाच्या निवडीच्या दृष्टिकोनातून गोंधळ उडताना दिसतो.

कारण अनेक छोटे-मोठे व्यवसायांची यादी पाहिली तर ती खूप मोठी होते व यामधून आपल्याला हवा आणि चांगला पैसा मिळवून देईल असा व्यवसाय प्रत्येक जण शोधत असतात व अशा व्यवसायाची निवड करताना लागणारी गुंतवणूक देखील डोळ्यासमोर ठेवली जाते.

Advertisement

जेणेकरून कमीत कमी गुंतवणुकीतून जास्तीत जास्त नफा देणाऱ्या व्यवसायाच्या शोधामध्ये प्रत्येक जण आपल्याला दिसून येतो. याच अनुषंगाने आपण या लेखामध्ये अशा एका व्यवसायाची माहिती बघणार आहोत जो तुम्हाला 80 हजार रुपये गुंतवणुकीतून महिन्याला 17 ते 20 हजार रुपये कमवून देऊ शकतो.

जॅम, जेली आणि मुरंबा व्यवसाय आहे फायद्याचा

Advertisement

हा व्यवसाय कोणत्याही वयोगटातील व्यक्ती अगदी सहजरित्या करू शकतो व आरोग्यासाठी देखील जेली तसेच मुरंबा आणि जॅम फायदेशीर असल्यामुळे या व्यवसायाला मागणी देखील चांगली आहे.

या व्यवसायाला येणाऱ्या खर्चाचा विचार केला तर खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने या व्यवसायाचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे व यानुसार हा व्यवसाय सुरू करण्याकरता तुम्हाला आठ लाख रुपये लागतात.

Advertisement

यामध्ये 1000 चौरस फुटांची बिल्डिंग किंवा शेड बांधण्यासाठी तुम्हाला दोन लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. तसेच यासाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी साडेचार लाख रुपये लागतात व दीड लाख रुपये खेळते भांडवल ठेवणे तुम्हाला गरजेचे आहे. घरच्या घरी जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर अवघ्या 80 हजार रुपयांच्या कमी खर्चात तुम्ही तो सुरू करू शकतात.

हा व्यवसाय कसा सुरु करावा?

Advertisement

तुम्हाला जेली किंवा मुरंबा,जॅम बनवण्यासाठी काही फळांची आवश्यकता भासते व यातूनच ही उत्पादने तयार होत असतात. फळांमुळे जेली आणि जॅम चवदार असतात व हे करण्यासाठी तुम्हाला फळे, साखर तसेच पेक्टीनची आवश्यकता असते.

अगदी कोणतीही व्यक्ती घरात बसून देखील ही उत्पादने तयार करू शकते. हा एक चांगला व्यवसाय असून या माध्यमातून तुम्ही इतर लोकांना देखील रोजगार करू शकतात.

Advertisement

या व्यवसायातून किती उत्पन्न मिळू शकते?

जर आपण खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचा अहवाल पाहिला तर त्यानुसार जर तुम्ही 231 क्विंटल जाम, जेली आणि मुरंबा तयार केला आणि त्याला 200 रुपये प्रति क्विंटल किंमत पाहिली तर यासाठीची तुमची किंमत पाच लाख सात हजार सहाशे रुपये असते व ते विकल्यानंतर तुम्हाला अंदाजे सात लाख दहा हजार सहाशे चाळीस रुपये मिळतील.

Advertisement

तुम्हाला या माध्यमातून दोन लाख तीन हजार चाळीस रुपये इतका नफा मिळेल. अशाप्रकारे तुम्ही प्रत्येक महिन्याला 17 हजार रुपये नफा या माध्यमातून मिळवू शकतात.

आर्थिक भांडवलासाठी मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकतात

Advertisement

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही मुद्रा कर्ज योजनेचा फायदा देखील घेऊ शकतात. यामध्ये तुम्ही सात लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज या व्यवसायासाठी मिळवू शकतात. कमीत कमी व्याजदरात तुम्हाला हे कर्ज मिळते व जर व्यवसायासाठी लागणारी जागा तुमची असेल तर खर्च आणखी कमी होतो. म्हणजे या व्यवसायामध्ये सगळ्यात जास्त खर्च हा जागेवर होत असतो व त्यानुसार तो वाढतो किंवा कमी होत राहतो.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *