Apply New Pan Card : आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी अतिशय आवश्यक आणि महत्त्वाची कागदपत्रे आहेत. Pan Card हे दस्तऐवज वित्तीय कामांसाठी खूपच गरजेचे असते. हे सरकारी दस्तऐवज भारतीय आयकर विभागाकडून दिले जाते. विशेष म्हणजे एका व्यक्तीला एकच पॅन कार्ड मिळते.
एखाद्या व्यक्तीजवळ दोन पॅन कार्ड आढळले तर हा एक गुन्हा समजला जातो. पॅन कार्ड हे बँकिंग कामासाठी, स्कॉलरशिपसाठी, आयकर भरण्यासाठी, ओळखीचा पुरावा, रहिवाशाचा पुरावा म्हणून उपयोगात येते. पॅन कार्ड शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील बंधनकारक आहे. आधार कार्ड प्रमाणेच पॅन कार्डचे देखील खूप सारे फायदे आहेत. मात्र अनेक लोकांचे पॅन कार्ड हरवते.
अशा परिस्थितीत पॅन कार्ड हरवले तर नवीन पॅन कार्ड कशा पद्धतीने मिळवले जाऊ शकते असा प्रश्न काही लोकांकडून उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण या प्रश्नाचे सविस्तर असे उत्तर थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पॅनकार्ड हरवले तर काय कराल?जर तुमचेही पॅन कार्ड हरवले असेल आणि तुम्हाला नवीन पॅन कार्ड मिळवायचे असेल तर यासाठी तुम्हाला आजची ही बातमी शेवटपर्यंत वाचायला लागेल. यासाठी तुम्हाला गुगलवर जायचे आहे.
गुगलवर केल्यानंतर तिथे रिप्रिंट पॅन कार्ड असे सर्च करा. यानंतर सर्च मध्ये येणाऱ्या पहिल्याच वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. किंवा तुम्ही https://www.onlineservices.nsdl.com/paam/ReprintEPan.html या वेबसाईटवर थेट जाऊ शकता. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे विचारलेली सर्व माहिती फिलअप करावी लागणार आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा पॅन नंबर, आधार कार्ड नंबर, डेट ऑफ बर्थ टाकावी लागणार आहे.
एवढी माहिती यशस्वीरित्या भरल्यानंतर दिलेल्या रकान्यात कॅप्चा कोड टाकायचा आहे. यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी पन्नास रुपयाचे पेमेंट करावे लागेल. पेमेंट केल्यानंतर नवीन पॅन कार्डसाठीचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट होईल. यानंतर तुमचे पॅन कार्ड पाच ते दहा दिवसात तुमच्या पत्त्यावर पोहोचेल.