Asia Longest Bridge : देशात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते विकासाची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. मोठमोठे महामार्ग तयार केले जात आहेत. उड्डाणपूल, सागरी पूल, बोगदे इत्यादी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत.
पण तुम्हाला माहितीये का देशातील सर्वाधिक लांबीचा पूल कोणता आहे. नाही ना ? मग आज आपण या हिंदुस्थानातील सर्वाधिक लांबीच्या पुलाबाबत डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, सहा वर्षांपूर्वी देशात आशिया खंडातील सर्वाधिक लांबीच्या काही मोजक्याच पुलांपैकी एका पुलाचे उदघाट्न करण्यात आले होते. हाचं पूल 2017 नंतर देशातील सर्वाधिक लांबीचा पूल म्हणून ओळखला जातोय.
देशातील सर्वाधिक लांबीचा पूल कोणता ?
आसाममधील लोहित नदीवर विकसित झालेला पूल भारतातील सर्वाधिक लांबीचा पूल म्हणून ओळखला जातो. हा पूल दोन राज्यांना जोडतो. हा पूल जवळपास तेरा मीटर रुंद आणि सव्वा नऊ किलोमीटर लांबीचा आहे.
या पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश ही दोन राज्य परस्परांना जोडली गेली आहेत. यामुळे ईशान्यकडील राज्यांमधील कनेक्टिव्हिटी सुधारली आहे. या सर्वाधिक लांबीच्या पुलाला भूपेन हजारिका पूल म्हणून ओळखले जात आहे.
तसेच या ब्रिजला ढोला – सादिया पूल या नावाने देखील संबोधले जाते. याचे उद्घाटन 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. हा पूल आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील ढोला आणि सादिया गावांना जोडत आहे.
तसेच साध्या गावापासून अरुणाचल प्रदेश या राज्याची सीमा अगदी जवळच आहे. यामुळे हा ब्रिज आसाम मधून अरुणाचल प्रदेश मध्ये जाण्यासाठी खूपच उपयोगाचा ठरत आहे.
यामुळे नागरिकांचा प्रवास गतिमान झाला आहे. या पुलाचे काम 2011 मध्ये सुरू झाले होते. तेथून सहा वर्षात म्हणजे 2017 मध्ये याचे काम पूर्ण झाले.
याचे काम काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झाले होते आणि बीजेपी सरकारच्या काळात हा पूल वाहतुकीसाठी सुरू झाला आहे.
याच्या कामासाठी साडेनऊशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. हा पूल एवढा मजबूत आहे की याला भूकंप आला तरीही काहीच होणार नाही. शिवाय यावर 60 टन वजनी युद्ध नौका सुद्धा जाऊ शकणार आहेत.