ATM Card Lost : अलीकडे भारतात बँक खातेधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः केंद्र शासनाने जनधन योजना राबवल्यानंतर बँक खातेधारकांची संख्या झपाट्याने विस्तारली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये देशातील बहुतांशी बँक खातेधारकांकडे ATM कार्ड आले आहे.
ATM मुळे आता खातेधारकांना देशातील कोणत्याही ठिकाणावरून सहजतेने बँकेतील पैसे काढता येऊ लागले आहेत. यामुळे पैशांचे व्यवहार सोपे झाले आहेत. एटीएम कार्डमुळे आता बँकेतून पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची गरजचं राहिलेली नाही.
निश्चितच एटीएम कार्ड मुळे बँक खाते धारकांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. पण जर बँकेचे एटीएम कार्ड हरवले तर काय केले पाहिजे? याबाबत अनेक बँक खातेधारकांना फारशी माहिती नसल्याचे पाहायला मिळत आहे.
अशा परिस्थितीत आज आपण एसबीआय खातेधारकांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण जर एसबीआय बँक खातेधारकांचे एटीएम कार्ड हरवले तर त्यांनी काय केले पाहिजे याविषयी माहिती घेऊन आलो आहोत.
SBI ATM कार्ड हरवले तर काय कराल?
एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी बँक आहे. ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेच्या खातेधारकांची संख्या करोडोंच्या घरात आहे.
जर तुमचेही एसबीआय मध्ये खाते असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. कारण की आज आपण एसबीआयचे एटीएम कार्ड हरवले तर काय केले पाहिजे हे पाहणार आहोत.
बँकेने सांगितल्याप्रमाणे, जर एसबीआयचे एटीएम कार्ड हरवले तर सर्वप्रथम खातेधारकांनी हे एटीएम कार्ड ब्लॉक केले पाहिजे. यासाठी बँकेच्या टोल फ्री क्रमांक वर संपर्क करावा लागणार आहे. यासाठी 1800 1234 किंवा 1800 2100 या टोल फ्री क्रमांकवर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून कॉल करावा लागणार आहे.
यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीची भाषा सिलेक्ट करायची आहे. यानंतर तुम्हाला टू ब्लॉक युवर एटीएम कार्ड, युपीआय, इंटरनेट बँकिंग हा मेनू सिलेक्ट करण्यासाठी 0 दाबायचे आहे. यानंतर एटीएम कार्ड ब्लॉक करा हा ऑप्शन सिलेक्ट करण्यासाठी 1 प्रेस करायचा आहे.
यानंतर सिस्टम तुमच्या एटीएम कार्डचे शेवटचे चार डिजिट अनाउन्स करेल आणि हे एटीएम कार्ड ब्लॉक केले जात आहे असे म्हणेल. यानंतर तुम्हाला एटीएम कार्ड ब्लॉकिंग कन्फर्म करण्यासाठी 1 प्रेस करावे लागणार आहे. कदाचित तुम्हाला एटीएम कार्ड किंवा बँक अकाउंटचे शेवटचे चार अंक प्रविष्ट करावे लागतील.
एकदा हे कन्फर्म झाले की तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक होईल. त्यानंतर तुम्हाला एक एसएमएस पाठवला जाईल. अशा तऱ्हेने तुम्ही एसबीआय एटीएम कार्ड हरवल्यानंतर तुमचे कार्ड ब्लॉक करू शकता.