Bank Account Cash Deposit Rule : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात कॅशलेस इकॉनॉमिला चालना मिळाली आहे. आता पैशांचे व्यवहार ऑनलाइन होऊ लागले आहेत. यामुळे सध्याच्या डिजिटल युगात पैशांच्या व्यवहारासाठी बँकेत अकाउंट असणे आवश्यक बनले आहे. हेच कारण आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये बँक खाते धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
अगदी खेड्यापाड्यात देखील बँक ग्राहकांची संख्या वाढली आहे. असा क्वचितच एखादा व्यक्ती असेल ज्याचे बँकेत खाते नाहीये. मजुरी करणाऱ्या लोकांपासून ते कंपनीत काम करणाऱ्या लोकांचे साऱ्यांचेच बँक अकाउंट आहे. विशेष म्हणजे सरकारने जनधन योजना राबवल्यापासून खाते धारकांची संख्या वाढली आहे.
यामुळे पैशांचे व्यवहार आधीच्या तुलनेत अधिक सोपे झाले आहेत. खरे तर बँकेचे वेगवेगळे खाते असते. जसे की बचत खाते, चालू खाते, पगार खाते असे वेगवेगळे खाते असतात. सर्वसामान्य लोकांचे मात्र बँकेत बचत खाते असते. मात्र या बचत खात्यात कॅश डिपॉझिट करण्याचे काही नियम असतात.
खरंतर, आपण बँकेच्या सेविंग अकाउंट मध्ये पैसे डिपॉझिट करत असतो. जेव्हा आपल्याला गरज भासते तेव्हा आपण हे पैसे काढतो किंवा ऑनलाईन पेमेंट करत असतो. मात्र, सेविंग अकाउंट मध्ये म्हणजेच बचत खात्यात पैसे डिपॉझिट करण्यासाठी एक लिमिट ठरवून देण्यात आली आहे.
या लिमिट पेक्षा जास्त पैसे डिपॉझिट केले तर ते बँक खातेधारकांसाठी धोक्याचे ठरू शकते. दरम्यान आता आयकर विभागाने बचत खात्यात रक्कम डिपॉझिट करण्यासंदर्भात काही गाईडलाईन जारी केल्या आहेत. आज आपण याच गाईलाईन संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
बचत खात्यात कॅश डिपॉझिट करण्याचे नियम
जर तुम्हाला तुमच्या सेविंग अकाउंट मध्ये पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम डिपॉझिट करायची असेल तर अशावेळी बँक तुमच्याकडून पॅन क्रमांक मागू शकते. सेविंग अकाउंट मध्ये एका दिवसात कमाल एक लाख रुपये डिपॉझिट करता येतात.
मात्र जे लोक नेहमी पैसे डिपॉझिट करत नाहीत त्यांच्यासाठी ही लिमिट अडीच लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. म्हणजे कधीतरी सेविंग अकाउंट मध्ये डिपॉजिट करणारे ग्राहक अडीच लाख रुपयांपर्यंतची रक्कम भरु शकतात.
तसेच एका आर्थिक वर्षात बँक खातेधारकाला त्यांच्या सेविंग अकाउंट मध्ये दहा लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करता येते. जर समजा एखाद्या व्यक्तीच्या अकाउंट मध्ये दहा लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम असेल तर अशा प्रकरणांमध्ये आयकर विभागाकडून चौकशी केली जाते.