Bank Employee News : तुम्हीही बँकेत नोकरीला आहात का ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच उपयोगाची ठरणार आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांचा कामाचा आठवडा पाच दिवसांचा होणार अशी बातमी वेगाने व्हायरल होत आहे.
केंद्रातील मोदी सरकार आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून बँकेतील कर्मचाऱ्यांचा कामाचा आठवडा पाच दिवसांचा करणार अशा चर्चा सध्या सुरु आहेत.
यामुळे खरंच मोदी सरकार असा काही प्लॅन बनवत आहे का? यासंदर्भात सरकारकडून त्यांची भूमिका काय आहे याबाबत जाणून घेणे सुद्धा अतिशय आवश्यक बनते.
दरम्यान याचबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे जर तुम्ही बँकेतील कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
अर्थमंत्री यांनी काय माहिती दिली
गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणुकीपुर्वी केंद्रातील मोदी सरकार बँकेतील कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी मोठा निर्णय घेईल असे बोलले जात आहे. बँक कर्मचाऱ्यांसाठी सरकार एकाच वेळी दोन निर्णय घेईल.
कर्मचाऱ्यांचा पगार 17 टक्क्यांनी वाढेल आणि त्यांचा कामाचा आठवडा पाच दिवसांचा होईल असा दावा काही प्रसारमाध्यमांमध्ये केला जात होता. निश्चितच जर सरकारने हा निर्णय घेतला तर सदर कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या स्थितीला बँकेतील कर्मचाऱ्यांना महिन्यातून दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी राहते. तसेच सर्व रविवारी सुट्टी असते. मात्र आता बँकेतील कर्मचाऱ्यांना पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी देखील सुट्टी मंजूर होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
मात्र, या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असेच सांगितले आहे. यामुळे सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
त्यामुळे साहजिकच सरकारी बँक कर्मचाऱ्यांची मोठी निराशा होण्याची शक्यता आहे. जर सरकारने हा निर्णय घेतला असता तर जवळपास आठ लाख बँक कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळाला असता.
आता मात्र अर्थमंत्री निर्मलाजी यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले असल्याने केंद्रातील मोदी सरकार बँकेतील कर्मचाऱ्यांचा कामाचा आठवडा पाच दिवसांचा करणार नाही का ? हा सवाल उपस्थित होत आहे.