Bank FD Interest Rate : भारतात गुंतवणुकीसाठी नानाविध पर्याय उपलब्ध आहेत. मात्र अलीकडे बँकेची एफडी योजना ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय झालेली आहे. खरे तर आधी महिला सोन्यात गुंतवणूक करण्याला विशेष पसंती दाखवत असत.
मात्र अलीकडे महिलांनी एफडी मध्ये गुंतवणूक करण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. याचे कारण म्हणजे अलीकडे एफडीच्या गुंतवणूकीसाठी बँका चांगले व्याजदर ऑफर करत आहेत.
आता बँकेच्या माध्यमातून आठ टक्क्यांपर्यंतचे व्याजदर एफडी साठी दिले जात आहे. दरम्यान आज आपण देशातील अशाच दोन बँकांची माहिती जाणून घेणार आहोत जे की एफडीसाठी आठ टक्क्यांपर्यंतचे व्याज देत आहेत.
आज आपण प्रायव्हेट सेक्टर मधील करूर वैश्य बँक आणि कर्नाटक बँक यांचे एफडी वरील व्याजदर जाणून घेणार आहोत. खरे तर करूर वैश्य बँकेने अलीकडेच त्यांची दोन कोटी पेक्षा कमीच्या मुदत ठेव म्हणजे FD वरील व्याजदरात बदल केले आहेत.
तसेच कर्नाटक बँकेने सुद्धा निवडक कालावधीसाठी त्यांचे FD व्याजदर बदलले आहेत. दोन्ही बँकांमधील मुदत ठेवींचे सुधारित दर 1 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाले आहेत.
अशा परिस्थितीत आता आपण या दोन्ही प्रायव्हेट सेक्टरमधील बड्या बँकेचे एफडी वरील व्याजदर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
करूर वैश्य बँक FD चे व्याजदर
या बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य गुंतवणूकदारांना चार टक्क्यांपासून ते 7.50 टक्क्यांपर्यंतचे व्याजदर ऑफर केले जात आहे. या बँकेकडून वरिष्ठ नागरिकांना 0.50% पर्यंतचे अधिकचे व्याजदर दिले जात आहे.
बँकेच्या माध्यमातून 444 दिवसांच्या एफडी योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांना तब्बल 8 टक्क्यांचे व्याजदर ऑफर केले जात आहे.
कर्नाटक बँक
सर्वसामान्य गुंतवणूकदारांना कर्नाटक बँकेच्या माध्यमातून एफडीसाठी 3.50% ते 7.5% दरम्यान व्याजदर ऑफर केले जात आहे. मात्र ज्येष्ठ नागरिकांना या बँकेच्या माध्यमातून अधिकचे व्याजदर पुरवले जात आहे.
विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून 0.40 टक्यांपासून ते 0.50 टक्क्यांपर्यंतचे अतिरिक्त व्याज ऑफर केले जात आहे. म्हणजेच याही बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 8% पर्यंतचे व्याज मिळत आहे.