Bank FD Scheme : अलीकडे गुंतवणूकदारांपुढे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या जोखीम पूर्ण ठिकाणी सुद्धा गुंतवणूक केली जात आहे. तर दुसरीकडे सोने-चांदी, रिअल इस्टेट यांसारख्या ठिकाणी देखील गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
मात्र आजही असे अनेक गुंतवणूकदार आहेत जे की बँकेची एफडी योजना, बँकेची आरडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजनांमध्ये पैसे गुंतवत आहेत. खरे तर बँकेची एफडी योजना ही फार पूर्वीपासून लोकप्रिय आहे. मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे.
अलीकडे मुदत ठेव योजनांमधून गुंतवणूकदारांना चांगला परतावा देखील मिळू लागला आहे. हेच कारण आहे की, यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या डे बाय डे वाढत आहे. जर तुम्हीही बँकेत एफडी करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे.
कारण की आज आपण मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्याचे काही तोटे अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्हाला हे तोटे सहन होत असतील तर तुम्ही एफडी मध्ये निश्चितच गुंतवणूक केली पाहिजे. कारण की, बँकेच्या एफडी योजनेमधील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूकीत येते.
कमी व्याज : बँकेत एफडी करण्याला अलीकडे विशेष महत्त्व आले आहे. याचे कारण म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये बँकेच्या माध्यमातून एफडीचे व्याजदर मोठ्या प्रमाणात वाढवले गेले आहेत. मात्र असे असले तरी आजही एफडीमधून मिळणारे रिटर्न हे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड पेक्षा कमी आहेत.
विशेष म्हणजे सोने-चांदी आणि रिअल इस्टेट मधून देखील गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. यामुळे एफ डी मधील गुंतवणूक ही सुरक्षित असली तरीदेखील कमी रिटर्न देत असल्याची तक्रार गुंतवणूकदार करून घेत जात आहे.
चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळत नाही : खरे तर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. मात्र एफडी योजनेतील गुंतवणुकीसाठी चक्रवाढ व्याज लागू होत नाही. म्हणजेच गुंतवणूकदारांना बँकेच्या माध्यमातून एफडीच्या संपूर्ण कालावधीसाठी एक समान व्याज दिले जाते.
FD तोडल्यास नुकसान होते : एफडी मध्ये गुंतवणुकीचा हा सर्वात मोठा लॉस आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांच्या कालावधीसाठी एफडी केली आणि त्याला काही कारणास्तव ही एफडी मध्येच तोडावी लागली तर अशा गुंतवणूकदाराला पेनल्टी देखील द्यावी लागते.
FD च्या व्याजेसाठी टॅक्स लागते : तुम्हाला एफडीवर मिळणारे व्याज थेट तुमच्या खात्यात जमा होऊ शकत नाही. यातून मिळालेल्या व्याजावर कर आकारला जातो. तुम्ही तुमचा ITR दाखल करता तेव्हा, FD मधून मिळणारे व्याज उत्पन्न म्हणून गणले जाते आणि त्यावर सरकार तुमच्याकडून कर वसूल करते.
टीडीएस लागतो : एफडीमधून मिळणाऱ्या व्याजावरही टीडीएस लावला जातो. बँका हे प्रत्येक वर्षाच्या शेवटी मिळणाऱ्या व्याजातून वजा करतात. तथापि, ठेवीदाराला TDS मधून बाहेर पडण्याचा आणि मुदतपूर्तीवर सर्व व्याज भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. फॉर्म 26AS ठेवीदाराच्या पॅन कार्डशी जोडलेला आहे आणि FD साठी केलेल्या सर्व TDS कपात येथे दाखवले जातात.