Bank FD Scheme : भारतात गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र आजही सुरक्षित गुंतवणुकीसाठी एफडी म्हणजेच मुदत ठेव करण्याला विशेष पसंती दाखवले जाते. मुदत ठेव योजनेत केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. यामुळे येथे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
दरम्यान जर तुम्हीही एफडी मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की आज आपण देशातील अशा तीन बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या एफडीवर सर्वोत्कृष्ट व्याजदर देत आहेत.
खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी एचडीएफसी या प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठ्या बँकेने आपल्या FD च्या व्याजदरात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे काही तज्ञांनी आगामी काळात एफडीचे व्याजदर आणखी वाढणार असा आशावाद व्यक्त केला आहे.
यामुळे नजीकच्या भविष्यात एफडी करणे चांगला पर्याय ठरू शकणार आहे. मात्र एफडी करताना अशा बँकेत एफडी केली पाहिजे जिथून आपल्याला चांगला परतावा मिळणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण देशातील टॉप तीन अशा बँकांची माहिती पाहणार आहोत ज्या एफडीवर चांगले व्याज देत आहेत.
एका वर्षाच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका
HDFC : आरबीआय ने गेल्या काही महिन्यांपूर्वी भारतातील सर्वाधिक सुरक्षित तीन बँकांची यादी प्रदर्शित केली होती. यामध्ये एचडीएफसी या प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठ्या बँकेचा समावेश होता. यामुळे या बँकेतील मधील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहणार आहे. बँकेकडून एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा देखील दिला जात आहे.
या बँकेकडून एका वर्षाच्या एफडीसाठी 7.10% एवढे व्याज ऑफर केले जात आहे. तसेच पंधरा ते अठरा महिन्यांसाठी 7.10%, 18 ते 21 महिन्यांसाठी 7.25, 21 महिने ते दोन वर्षे 11 महिने एफडी करिता सात टक्के आणि दोन वर्षे 11 महिने ते 35 महिन्यांच्या एफडी करिता 7.15 टक्के एवढी व्याजदर ऑफर केले जात आहे.
ICICI बँक : प्रायव्हेट सेक्टर मधील आणखी एक मोठी बँक. ही देखील बँक देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत देते. या बँकेकडून एफडीसाठी चांगल व्याजदर ऑफर केले जात आहे. ही बँक एका वर्षाच्या FD वर 7.40 टक्के, 390 दिवस ते 15 महिन्यांसाठी 7.30 टक्के, 15 महिने ते 2 वर्षांसाठी 7.05 टक्के, 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी 7 टक्के एवढे व्याज देत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया : एसबीआय ही देशातील पब्लिक सेक्टरमधील अर्थातच सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. देशात एकूण 12 पीएसबी असून स्टेट बँक ऑफ इंडिया ही या 12 मध्ये सर्वात मोठी बँक आहे.
विशेष म्हणजे या सरकारी बँकेकडून आपल्या ग्राहकांना एफडी साठी चांगले व्याजदर ऑफर केले जात आहे. या बँकेकडून एका वर्षाच्या FD वर 6.80 टक्के, 2 ते 3 वर्षांसाठी 7 टक्के, 3 ते 5 वर्षांसाठी 6.75 टक्के एवढे व्याज दिले जात आहे.
5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर परतावा 6.5 टक्के व्याज मिळत आहे. यामुळे या बँकेच्या FD त गुंतवणूक करणाऱ्याना चांगला परतावा मिळणार आहे.