Bank Of Baroda And Canara Bank FD Rate : बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. जर तुमचेही या बँकेत अकाउंट असेल तर तुमच्यासाठी ही बातमी विशेष कामाची ठरणार आहे.
खरंतर अलीकडे अनेक गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी एफडीला महत्त्व देत आहे. अनेकांना सुरक्षित गुंतवणुकीसाठी एफडी करायची आहे. दरम्यान आता बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँकेकडून एफडी करणाऱ्यांना अधिक व्याजदर ऑफर केले जाणार आहे.
या दोन्ही बँकांनी एफडीच्या व्याजदरात सुधारणा केली आहे. अशा परिस्थितीत आता आपण बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँकेने कोणत्या कालावधीच्या एफडी व्याजदरात वाढ केली आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बँक ऑफ बडोदा : मिळालेल्या माहितीनुसार बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून एक वर्षांपासून ते 400 दिवसांच्या कालावधीच्या आणि चारशे दिवसांपासून ते दोन वर्षांच्या कालावधीच्या FD व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.
आधी बँकेच्या माध्यमातून या दोन्ही एफ डी साठी 6.75 टक्के एवढे व्याज ऑफर केले जात होते. आता मात्र बँकेने यामध्ये 0.10 टक्क्यांची वाढ केली आहे.
म्हणजेच आता या दोन्ही कालावधीच्या एफडी साठी ग्राहकांना 6.85% एवढे व्याज मिळणार आहे. दरम्यान बँक ऑफ बडोदाने सुधारित केलेले हे नवीन व्याजदर 15 फेब्रुवारी 2024 पासून लागू राहणार आहेत.
कॅनरा बँक : बँकेने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दोन कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या एफडी व्याजदरात वाढ केली आहे.
या बँकेकडून आता बल्क एफडी साठी म्हणजेच दोन कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या एफडीसाठी बँकेकडून सर्वाधिक 7.25% पर्यंतचे व्याज ऑफर केले जाणार आहे.
बँकेने हे नवीन दर 19 फेब्रुवारी 2024 पासून लागू केले आहेत. बँकेकडून सात दिवसांपासून ते दहा वर्षेपर्यंतच्या कालावधीची एफडी ऑफर केली जात आहे.
बँकेकडून 180 ते 269 दिवसाच्या बल्क एफडीवर म्हणजेच दोन कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या एफडीवर सर्वाधिक 7.25% एवढे व्याज दिले जात आहे.