Bank Of Baroda EMI : अलीकडे घर घेणे म्हणजे मोठे आव्हानात्मक काम बनले आहे. एकतर वाढत्या लोकसंख्येमुळे जागेचा शॉर्टेज तयार झाला आहे. यामुळे घर घेणाऱ्यांना योग्य लोकेशनवर घर शोधण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते.
अनेक ठिकाणी खेटे मारावे लागतात, विकासकांच्या कार्यालयात वारंवार चकरा मारून घर मिळवावे लागते. दुसरे म्हणजे घर सापडले तर त्याच्या किमती खूपच अधिक राहतात. अशा परिस्थितीत घर घेणे सर्वसामान्यांसाठी अवजड होऊ लागले आहे.
परिणामी अनेकजण स्वप्नातील घराची निर्मिती करण्यासाठी होम लोन घेतात. होमलोन घेऊन घर उभारणाऱ्यांची संख्या आपल्या देशात खूपच अधिक आहे. खरे तर देशातील अनेक बँका होम लोन पुरवतात. मात्र प्रत्येक बँकेचे होम लोनचे व्याजदर हे वेगवेगळे आहे.
बँक ऑफ बडोदा देखील आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त व्याजदरात होम लोन पुरवत आहे. बँकेकडून नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात.
गृहकर्जासाठी देखील बँकेच्या माध्यमातून वेळोवेळी वेगवेगळे योजना राबवल्या जातात. सर्वसामान्यांना स्वस्त व्याजदरात गृहकर्ज मिळावे यासाठी बँकेकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान सध्या स्थितीला बँक ऑफ बडोदा कडून गृह कर्ज देतांना 8.4 टक्के व्याजदराने गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
अशा परिस्थितीत जर बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून 30 लाख रुपयांचे गृह कर्ज घेतले तर किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागू शकतो असावा अनेकांनी विचारला होता.
यामुळे आज आपण याच प्रश्नाचे अगदी थोडक्यात उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर बँक ऑफ बडोदा कडून 30 लाख रुपयांचे गृह कर्ज घेतले तर कितीचा ईएमआय भरावा लागेल हे आता आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
जर समजा तुम्ही या बँकेकडून 30 लाख रुपयांचे कर्ज पंधरा वर्षांच्या काळासाठी घेतले तर तुम्हाला 29 हजार 367 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. या कालावधीत तुम्हाला जवळपास 22 लाख 85 हजार रुपयांचे व्याज बँकेला द्यावे लागणार आहे.
म्हणजेच तीस लाख रुपयाचे घर तुम्हाला 52 लाख 85 हजार रुपयांना पडणार आहे. मात्र बँकेने व्याजदरात बदल केला तर याचा परिणाम म्हणून तुमची ईएमआय वाढू शकते किंवा घटू शकते याची नोंद घेणे आवश्यक आहे.