Bank Of Baroda New FD Scheme : अलीकडे भारतात एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. याचे कारण म्हणजे आता एफडी मधूनही चांगले व्याज मिळत आहे. परिणामी सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असलेला एक मोठा वर्ग आता एफडी कडे वळाला आहे.
सोने आणि चांदी मध्ये सुरक्षित गुंतवणूक करू पाहणारा वर्ग देखील आता एफडी करत आहे. खरे तर भारतीय रिझर्व बँकेने गेल्या काही महिन्यात रेपो रेट मध्ये मोठी वाढ केली आहे याचा परिणाम म्हणून एफडीच्या व्याजदरात देखील बँकांनी वाढ केली आहे.
परिणामी मुदत ठेव करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू लागला आहे. अशातच आता एफडी करू इच्छिणाऱ्यांसाठी बँक ऑफ बडोदा या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने एक मोठी भेट दिली आहे. ती म्हणजे बँकेने एक नवीन एफडी योजना जारी केली आहे.
या नवीन एफडी योजनेत आजपासून अर्थातच 15 जानेवारी 2024 पासून गुंतवणूक देखील करता येणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण बँक ऑफ बडोदा ने जारी केलेल्या या नवीन एफडी योजनेची संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी आहे नवीन FD योजना
बँक ऑफ बडोदा ने दिलेल्या माहितीनुसार, या नवीन एफडी योजनेत दोन कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येणार आहे. या एफडी ला बीओपी 360 असे नाव देण्यात आले आहे. याचा कालावधी 360 दिवसांचा राहणार आहे.
या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.10% व्याजदराने रिटर्न दिले जाणार आहेत. तथापि जर गुंतवणूकदार ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना 0.50% अधिकचे व्याजदर मिळणार आहे. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेत गुंतवणूक केली तर त्यांना 7.60% दराने रिटर्न मिळणार आहेत.
नवीन FD त कोण गुंतवणूक करू शकत
या बँकेच्या नवीन मुदत ठेव योजनेत कोणताही ग्राहक गुंतवणुकीस पात्र राहणार आहे. या स्कीममध्ये किमान 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येणार आहे. म्हणजेच ग्राहकांना कमी रकमेपासून यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे.
या स्कीममध्ये रु 1 च्या पटीत रु. 2 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवता येणार आहे. दोन कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम मात्र या योजनेत गुंतवता येणार नाही.
यामध्ये ऑटो रिन्यूअल आणि नॉमिनेशन सुविधाही देण्यात आल्या आहेत. निश्चितच ही योजना बी ओ बी मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी खूपच खास ठरणार आहे.