Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदा ही देशातील पब्लिक सेक्टरमधील एक मोठी बँक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच वेगवेगळे निर्णय घेत असते.
दरम्यान, बँकेने मार्च एंडिंग आधीच एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय बँक ऑफ बडोदा मध्ये एफडी करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बँक ऑफ बडोदाने एक नवीन एफडी योजना लॉन्च केली आहे. यामुळे BOB मध्ये एफडी करू इच्छिणाऱ्यांना चांगला परतावा मिळू शकणार आहे.
अशा परिस्थितीत, आता आपण बँक ऑफ बडोदाने लॉन्च केलेल्या या नवीन एफडी योजनेची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बँक ऑफ बडोदाची नवीन एफडी योजना कशी आहे ?
एसबीआयनंतर बँक ऑफ बडोदाने देखील एक नवीन ग्रीन एफडी योजना लॉन्च केली आहे. याला BOB अर्थ ग्रीन टर्म डिपॉझिट योजना असे नाव देण्यात आलेले आहे.
पर्यावरणाशी संबंधित प्रकल्पांना वित्तपुरवठा करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेची सुरुवात कालपासून अर्थातच 11 मार्च 2024 पासून झाली आहे.
ग्रीन एफडीमधील गुंतवणुकीवर बँक ७.१५ टक्क्यांपर्यंत व्याज देईल. या एफडीमध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येणार आहे.
मात्र वेगवेगळ्या कालावधीमधील गुंतवणुकीसाठी मिळणारे व्याज हे वेगवेगळे राहणार आहे. या नवीन ग्रीन एफडी योजनेत एक वर्षापासून ते 2201 दिवसाच्या कालावधीसाठी एफडी करता येणार आहे.
या एफडी योजनेत ग्राहकांना किमान 5000 आणि कमाल दोन करोड रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येणार आहे.
किती व्याजदर मिळणार ?
बँक ऑफ बडोदाने नुकत्याच जाहीर केलेल्या ग्रीन एफडी योजनेत एक वर्ष कालावधीसाठी गुंतवणूक केली तर त्यांना 6.75 टक्के, 1.5 वर्ष कालावधीसाठी 6.75 टक्के, 777 दिवसासाठी 7.15 टक्के, 1111 दिवसाच्या एफ डी साठी 6.4 टक्के, 1717 दिवसाच्या एफडी साठी 6.4 टक्के, 2201 दिवसाच्या एफडी साठी 6.4 टक्के एवढे व्याज दिले जाणार आहे.