Bank Recruitment 2024:- सध्याचे तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेत किंवा विविध स्पर्धा परीक्षा तसेच बँकांच्या परीक्षांची तयारी करत आहेत.अशा तरुण-तरुण करिता आता नोकरीच्या खूप मोठमोठे संधी चालून येत असून या सुवर्णसंधीचे सोने करण्याची आता गरज आहे.

आता शासकीय विभाग अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेतच.परंतु संरक्षण क्षेत्र असो किंवा बँक असो यामध्ये देखील आता भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत.

Advertisement

या अनुषंगाने तुम्ही देखील जर बँकेच्या विविध पदांसाठी असलेल्या भरतीची तयारी करत असाल तर पंजाब नॅशनल बँकेमध्ये नोकरीची एक मोठी संधी चालून आली असून या बँकेत विविध रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात काढण्यात आलेली आहे. यासाठी जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील ते ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकणार आहेत.

 पंजाब नॅशनल बँकेत १०२५ रिक्त पदांसाठी भरती

Advertisement

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंजाब नॅशनल बँकेमध्ये विविध रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात काढण्यात आलेली असून याकरिता पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ही भरती प्रामुख्याने 1025 रिक्त पदांसाठी राबवण्यात येणारी असून यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.

 रिक्त पदे आणि त्यासाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता

Advertisement

1- ऑफिसर क्रेडिट JMGS I- या पदाच्या 1000 जागा रिक्त आहेत व यासाठी शैक्षणिक पात्रता CA/CMA(ICWA) किंवा सीएफए किंवा एमबीए किंवा मॅनेजमेंटमध्ये पीजी डिप्लोमा किंवा समतुल्य शिक्षण असणे आवश्यक आहे.

2- मॅनेजरफॉरेक्स MMGS II- या पदाच्या 15 जागा रिक्त असून यासाठी शैक्षणिक पात्रता एमबीए किंवा मॅनेजमेंट मध्ये पीजी डिप्लोमा किंवा समतुल्य शिक्षण असणे आवश्यक आहे.

Advertisement

3- मॅनेजरसायबर सिक्युरिटी MMGS II- या पदाच्या पाच जागा रिक्त असून यासाठी 50% गुणांसह बीई/ बी टेक( कॉम्प्युटर सायन्स/ आयटी / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन) शिवाय एमसीए

4- सीनियर मॅनेजरसायबर सिक्युरिटी MMGS III- या पदाच्या पाच जागा रिक्त असून यासाठी 50 टक्के गुणांसह बीई/ बी टेक( कम्प्युटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन) शिवाय एमसीए  शिक्षण आवश्यक आहे.

Advertisement

 यासाठी आवश्यक वयोमर्यादा

या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील त्यांचे एक जानेवारी 2024 रोजी वय 28 ते 38 वर्षे दरम्यान असावे. एससी आणि एसटी वर्गातील उमेदवारांना वयात पाच वर्षाची सूट असणार आहे व इतर मागासवर्ग प्रवर्ग अर्थात ओबीसी उमेदवारांना वयात तीन वर्षाची सूट मिळणार आहे.

Advertisement

 किती आहे परीक्षा शुल्क?

यामध्ये जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील अशा जनरल व ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 1180 रुपये परीक्षा फी लागणार असून एससी/ एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांना 59 रुपये इतकी परीक्षा शुल्क लागणार आहे.

Advertisement

 पदनिहाय किती मिळेल वेतन?

1- ऑफिसरक्रेडिट JMGS I- या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 36000 ते 63 हजार 840 रुपये दरमहा वेतन मिळेल.

Advertisement

2- मॅनेजरफोरेक्स MMGS II- या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 48,170 ते 69 हजार 810 दरमहा वेतन मिळेल.

3- मॅनेजर सायबर सिक्युरिटी MMGS II- या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 48 हजार 170 ते 69 हजार 810 वेतन मिळेल.

Advertisement

4- सीनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटी या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 63 हजार 840 ते 78 हजार 230 रुपये इतके मासिक वेतन मिळेल.

 नोकरीचे ठिकाण

Advertisement

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये कुठेही नियुक्ती दिली जाईल.

 अर्ज करण्याची अंतिम तारीख

Advertisement

या भरती करिता आवश्यक अर्ज प्रक्रिया 7 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झाली असून अंतिम अर्ज करण्याची तारीख ही 25 फेब्रुवारी 2024 आहे. तसेच या भरतीसाठी आवश्यक ऑनलाईन परीक्षा ही मार्च/ एप्रिल 2024 या कालावधीत होणार आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *