Banking Fraud : अलीकडे भारतात विविध कारणांसाठी कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे आपल्या देशात आता कर्ज मिळवणे अधिक सोपे झाले आहे. काही बँका अगदी ताबडतोब कर्ज मंजूर करून देत आहेत.
यामुळे पैशांची गरज असल्यास आता ताबडतोब पैसे उपलब्ध होऊ लागले आहेत.ऑनलाइन लोन अप्रूव्ह होत असल्याने सर्वसामान्यांना कर्ज घेताना आता फारशी अडचण सहन करावी लागत नाही.
मात्र या ऑनलाइन सिस्टीम मुळे आपल्या देशात गेल्या काही वर्षांमध्ये सायबर गुन्ह्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
सायबर गुन्हेगार अनेकदा दुसऱ्याच्या नावावर बनावट कर्ज घेतात. यामुळे ज्याच्या नावावर कर्ज घेतले आहे त्याला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
अशा परिस्थितीत जर तुमच्या नावावर कोणी दुसऱ्या व्यक्तीने कर्ज घेतले असेल तर हे कस चेक करायच ? यासाठी काय प्रोसेस असते याबाबत अनेकांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती.
यामुळे आता आपण याच प्रश्नाचे उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.मीडिया रिपोर्ट नुसार, अनेक लोक फसवणूक करून दुसऱ्याच्या नावावर कर्ज घेतात.
मात्र हे कर्ज ज्याच्या नावावर घेण्यात आले आहे त्यालाच फेडावे लागते. यामुळे आता आपण जर तुमच्या नावावर दुसऱ्या कोणी व्यक्तीने कर्ज घेतले असेल तर ते कसे चेक केले जाऊ शकते याविषयी जाणून घेणार आहोत.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, तुमच्या नावावर किती कर्जे घेतली आहेत हे तुम्हाला तपासायचे असेल तर तुम्ही ते तुमच्या सिबिल स्कोरवरून तपासू शकता. CIBIL स्कोरमध्ये सदर व्यक्तीने घेतलेल्या कर्जाचे संपूर्ण तपशील नमूद केलेले असतात.
यामुळे जर तुम्हालाही तुमच्या नावावर कोणीतरी फसवणूक करून कर्ज काढले आहे असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या सिबिल स्कोर वरून कर्जाचे तपशील जाणून घेऊ शकता.
जर तुमच्या नावावर कोणतेही बनावट कर्ज असेल तर तुम्ही त्याची माहिती CIBIL स्कोरवरून मिळवू शकणार आहात.