Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया ही देशातील एकमात्र बँकिंग नियामक संस्था आहे. आरबीआयचा देशातील खाजगी, सरकारी आणि सहकारी बँकेवर कमांड असतो. एवढेच नाही तर नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्यांना देखील RBI चे नियम, अटी आणि शर्तीच्या अधीन राहावे लागते.
नियमांचे उल्लंघन झाल्यास आरबीआयकडून मोठी कारवाई होते. यामुळे बँकांना आरबीआयच्या नियमांचे पालन करावे लागते. ज्या बँका नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते.
काही बँकांचे तर लायसन्स देखील रद्द करण्यात आले आहेत. गेल्या महिन्यातही एका प्रमुख सहकारी बँकेचे लायसन्स रद्द झाले होते.
तसेच नुकत्याच एक दोन दिवसांपूर्वी पेटीएम पेमेंट बँकेवर देखील आरबीआयने मोठी कारवाई केली आहे. यामुळे पेटीएम पेमेंट बँकेचा ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
अशातच आता रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून देशातील एका नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनी अर्थातच एनबीएफसीवर कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नियमांचे उल्लंघन झाले असल्याने आरबीआयने बजाज हाउसिंग फायनान्स या नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनीला लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. काही नियामक तरतुदींचे पालन न केल्याबद्दल सेंट्रल बँकेने बजाज हाऊसिंग फायनान्सला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी आपल्या एका निवेदनात म्हटले आहे की, नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी – हाउसिंग फायनान्स कंपनी, मार्गदर्शक तत्त्वे, 2021 च्या काही तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 31 मार्च, 2022 ला कंपनीच्या आर्थिक स्थितीच्या बाबतीत त्याची वैधानिक तपासणी राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेने केली होती.
आरबीआयने म्हटले आहे की, पुण्यातील कंपनीने आरबीआयकडून व्यवस्थापन बदलण्यासाठी पूर्व-लिखित परवानगी घेतली नाही. या बदलानुसार स्वतंत्र संचालक वगळता ३० टक्क्यांहून अधिक संचालक बदलले गेले.
तथापि, मध्यवर्ती बँकेने सांगितले की दंड नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित आहे आणि कंपनीने आपल्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहार किंवा कराराच्या वैधतेवर परिणाम करण्याचा त्यांचा हेतू नाहीये.