Banking News : येत्या पाच-सहा दिवसांनी जुलै महिन्याची सांगता होणार आहे आणि ऑगस्ट महिन्याची सुरुवात होणार आहे. दरम्यान, ऑगस्ट महिना सुरू होण्याआधीच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ही अपडेट आहे बँकांच्या सुट्ट्या संदर्भात.
जसं की आपणास ठाऊकच आहे की प्रत्येक महिन्याला आरबीआयच्या माध्यमातून सुट्ट्यांची यादी जाहीर केली जात असते. ऑगस्ट महिन्यांची सुट्ट्यांची यादी देखील आरबीआयने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केली आहे.
आज आपण हीच यादी पाहणार आहोत. जर तुमचेही पुढल्या महिन्यात बँकेत काही काम असेल तर तुम्हाला या सुट्ट्यांची माहिती असणे आवश्यक राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुढल्या ऑगस्ट महिन्यात बँकांना तब्बल तेरा दिवसांसाठी सुट्ट्या राहणार आहेत. मात्र राज्यानुसार सुट्ट्यांची संख्या कमी-जास्त होणार आहे. म्हणजेच सर्वच राज्यात तेरा दिवस बँकांना कुलूप राहणार नाही.
अशा परिस्थितीत आज आपण आरबीआयने जाहीर केलेली ऑगस्ट महिन्यातील बँकांची सुट्ट्यांची यादी अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी खालीलप्रमाणे
ऑगस्ट महिन्यात चार रविवारी बँका बंद राहतील आणि दुसऱ्या तसेच चौथ्या शनिवारी म्हणजे दोन शनिवारी बँकांना सुट्टी राहणार आहे. 4 ऑगस्ट, 11 ऑगस्ट, 18 ऑगस्ट आणि 25 ऑगस्टला रविवार निमित्ताने देशभरातील बँकांना सुट्टी राहणार आहे.
तसेच 10 ऑगस्ट आणि 24 ऑगस्टला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या निमित्ताने देशभरातील बँकांना सुट्टी राहणार आहे. याशिवाय, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरातील बँकांना सुट्टी राहणार आहे. 19 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या निमित्ताने देशातील अनेक राज्यांमधील बँकांना बंद राहणार आहे.
या दिवशी उत्तराखंड, दमण आणि दीव, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरात, चंदीगढ आणि उत्तर प्रदेशमध्ये बँकांना सुट्टी राहणार आहे. तसेच 26 ऑगस्ट ला जन्माष्टमी असल्याने या दिवशीही देशातील अनेक राज्यांमधील बँकांना सुट्टी राहणार आहे.