Banking News : आरबीआय ही भारत सरकारने स्थापित केलेली एक बँकिंग नियमक संस्था आहे. ही संस्था देशातील सर्वच बँकांवर नियंत्रण ठेवत असते. देशातील पब्लिक सेक्टर मधील म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी क्षेत्रातील बँकांना आरबीआयच्या नियमांचे पालन करावे लागते.
ज्या बँका या नियमांचे उल्लंघन करतात त्यांच्यावर आरबीआयच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जाते. काही बँकांवर दंडात्मक कारवाई केली जाते तर काही बँकांचे लायसन्स देखील रद्द केले जातात.
अशातच आता आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया ने देशातील तीन बड्या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामुळे संबंधित बँकांच्या खातेधारकांमध्ये सध्या मोठे भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान आरबीआयने देशातील या बड्या बँकांवर केलेल्या दंडात्मक कारवाईचे स्पष्टीकरण देखील दिलेले आहे. या कारवाईमुळे सदर बँकेतील खातेधारकांमध्ये काय परिणाम होणार? याबाबत देखील मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
आता आपण आरबीआय ने देशातील कोणत्या तीन बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे आणि याचा ग्राहकांवर काय परिणाम होणार आहे याविषयी सविस्तर असे अपडेट पाहणार आहोत.
कोणत्या बँकेवर झाली दंडात्मक कारवाई
पंजाब अँड सिंध बॅंक : या बँकेवर मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एका कंपनीला नियमबाह्य कर्ज दिल्याबद्दल सदर बँकेवर दंडात्मक कारवाई केली असल्याचे मध्यवर्ती बँकेने स्पष्ट केले आहे.
धनलक्ष्मी बँक : या बँकेवर आरबीआयने एक कोटी, वीस लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. वैधानिक आणि इतर निर्बंधांसह KYC आणि कर्ज, अॅडव्हान्सवरील व्याजदरांशी निगडीत नियमांचे उल्लंघन केल्याने या बँकेवर ही कोट्यावधी रुपयांची दंडात्मक कारवाई झाली आहे.
ESAF स्मॉल फायनान्स : या बँकेवर आरबीआयच्या माध्यमातून 29.55 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ग्राहक सेवेच्या निर्देशांचे पालन न केल्याने मध्यवर्ती बँकेने ही दंडात्मक कारवाई केली आहे.
ग्राहकांवर काय परिणाम होणार
आरबीआय ने सांगितल्याप्रमाणे या निर्णयाचा ग्राहकांवर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही. संबंधित बँकांनी नियमाचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर ही दंडात्मक कारवाई झाली असून यामुळे ग्राहकांच्या पैशांवर आणि व्यवहारावर गदा येणार नाही.
आधीप्रमाणेच ग्राहकांचे व्यवहार सुरळीत सुरू राहणार आहे त्यामुळे ग्राहकांनी चिंता करू नये असे जाणकारांनी स्पष्ट केले आहे.