Banking News : बँकिंग सेक्टरसाठी आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने देशातील पाच बड्या बँकांवर मोठी कारवाई केली आहे. यामुळे सध्या सदर बँकेच्या खातेधारकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
खरंतर गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआयने देशातील अनेक बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. एवढेच नाही तर काही बँकांचे लायसन्स देखील मध्यवर्ती बँकेने रद्द केले आहेत.
बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यामुळे काही बँकेचे परवाने रद्द झाले आहेत. ठेवीदारांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी मध्यवर्ती बँकेकडून काही दिवाळखोर बँकेचे लायसन रद्द केले गेले आहे.
अशातच आता आरबीआयने राजकोट नागरिक सहकारी बँक, नवी दिल्ली स्थित द कांगडा को-ऑपरेटिव्ह बँक, लखनऊ येथील राजधानी नगर सहकारी बँक, उत्तराखंड येथील जिल्हा सहकारी बँक गढवाल आणि जिल्हा सहकारी बँक देहरादून या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
यातील राजकोट नागरिक सहकारी बँकेला 43.30 लाख, तसेच नवी दिल्ली स्थित द कांगडा कॉपरेटिव्ह बँक, लखनऊ येथील राजधानी नगर सहकारी बँक, उत्तराखंड येथील जिल्हा सहकारी बँक गढवाल या तिन्ही बँकांना प्रत्येकी पाच लाख रुपये एवढा दंड ठोठावण्यात आला आहे.
याशिवाय जिल्हा सहकारी बँक देहरादून या सहकारी बँकेला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे सध्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र या कारवाईचा ग्राहकांवर कोणताच परिणाम होणार नाही.
या सदर बँकेचे व्यवसाय आधी सारखेच सुरू राहणार आहेत. यामुळे ग्राहकांनी चिंता करू नये असे आवाहन जाणकारांनी केले आहे.
केवळ या सदर सहकारी बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर ही दंडात्मक कारवाई झालेली आहे. याचा ठेवीदारांवर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही.