Banking News : भारतात बँक खाते धारकांची संख्या करोडोंच्या घरात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बँक खातेधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सरकारने बँक ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये मोठी मेहनत घेतली आहे. याच मेहनतीचा परिणाम म्हणून आज भारतात बँक ग्राहकांची संख्या खूपच मोठ्या प्रमाणात वधारली आहे.
शिवाय गेल्या काही वर्षांमध्ये छोटे-मोठे व्यवहार देखील कॅश ऐवजी डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून केले जात आहेत. डिजिटल पेमेंट एप्लीकेशनचा वापर आपल्या देशात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेष म्हणजे डिजिटल पेमेंटला शासनाच्या माध्यमातून चालना देण्याचे देखील काम युद्ध पातळीवर सुरू आहे. फोन पे, गुगल पे, पेटीएम यांसारख्या डिजिटल पेमेंट एप्लीकेशन चा वापर आता वाढत चालला आहे.
मात्र असे असले तरी आजही अनेक लोक चेक ने पेमेंट करण्यास अधिक पसंती दाखवतात. चेकने पेमेंट करणाऱ्यांची आणि स्वीकारणाऱ्यांची संख्या देखील अलीकडे वाढली आहे. दरम्यान जर तुम्हीही चेकने पेमेंट स्वीकारत असाल किंवा कोणाला चेकने पेमेंट देत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे.
कारण की आज आपण रिझर्व बँक ऑफ इंडिया अर्थातच आरबीआयने चेकच्या संदर्भात तयार केलेल्या एका महत्त्वाच्या नियमाबाबत जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. खरंतर जर तुम्ही चेकने कोणाला पेमेंट करत असाल तर तुम्ही चेकवर रक्कम भरल्यानंतर ओन्ली किंवा फक्त हा शब्द नक्कीच लिहत असाल.
मात्र अनेकांकडून जर चेकवर रक्कम भरल्यानंतर Only किंवा फक्त हा शब्द लिहला नाही तर असा चेक रद्द होतो कां? किंवा बाऊन्स होतो का? हा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान आज आपण याबाबत आरबीआयने कोणते नियम तयार केले आहेत याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
काय सांगतो RBI चा नियम ?
खरंतर चेकवर रक्कम भरताना पुढे ओन्ली लिहलेच पाहिजे असा कोणताच नियम आरबीआय ने तयार केलेला नाही. म्हणजे जर तुम्ही चेकवर रक्कम भरताना पुढे ओन्ली किंवा फक्त हे शब्द लिहिले नाही तरी देखील तुमचा चेक हा वैध राहणार आहे. मात्र चेकवर अक्षरी रक्कम भरताना पुढे ओन्ली किंवा फक्त शब्द लिहिला किंवा अंकात रक्कम भरतांना /- असे चिन्ह टाकले तर त्या रकान्यात पुढे जागा उरत नाही.
त्यामुळे तुमच्या चेकवर कोणीही अतिरिक्त रक्कम भरू शकत नाही. याचाच अर्थ चेक वर ओन्ली शब्द लिहिला तर तुमचा चेक सुरक्षित होतो. जर समजा तुम्ही चेकद्वारे एखाद्या व्यक्तीला 1 लाख रुपये देणार आहात.
आणि तुम्ही चेकवर शब्दात लिहिताना फक्त 1 लाख एवढेच लिहले म्हणजे रकमेच्या पुढे ‘only’ असं लिहिलं नाही. तर अशावेळी तुम्ही लिहिलेल्या रकमेच्या पुढे एखादी व्यक्ती रक्कम वाढवून लिहू शकते. साहजिकच यामुळे तुमचे नुकसान होणार आहे. यामुळे चेकवर अक्षरी रक्कम भरली की Only किंवा फक्त लिहले पाहिजे आणि संख्यांमध्ये रक्कम भरताना, ‘/-‘ हे चिन्ह टाकले पाहिजे. असे केल्याने त्या रकान्यात समोर जागा उरणार नाही आणि त्यात कोणीच जास्त रक्कम टाकू शकणार नाही.