Banking News : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये बँकिंग क्षेत्रात मोठा रीफॉर्म आला आहे. बँकिंग क्षेत्रात झालेली सुधारणा सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरली आहे. आता आपल्या देशात रोकड व्यवहारांऐवजी कॅशलेस व्यवहार करण्याला पसंती दाखवली जात आहे.
ऑनलाइन पेमेंटचा वापर अधिक होऊ लागला आहे. कोणाला पैसे पाठवायचे असतील किंवा कोणाकडून पैसे घ्यायचे असतील तर आता ऑनलाईन पेमेंट केले जाऊ लागले आहे. यासाठी डिजिटल पेमेंट एप्लीकेशनचा वापर होत आहे.
यामुळे निश्चितच सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत आहे. यासोबतच मात्र ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार देखील मोठे वाढले आहेत. ऑनलाइन फसवणुकीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे.
सायबर चोरांकडून वेगवेगळ्या क्लुप्त्या आणि शक्कल लढवून सर्वसामान्यांच्या पैशांवर डल्ला मारला जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कष्टाचे पैसे त्यांच्याकडून हिरावले जात आहेत.
यामुळे आता ऑनलाईन फसवणुकीपासून स्वतःला सुरक्षित ठेवणे आवश्यक झाले असून यासाठी नागरिकांनी योग्य काळजी घेतली पाहिजे असे आवाहन केले जात आहे. देशात आता मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सायबर चोरी केली जाऊ लागली आहे.
मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या बँक खात्यांवर डल्ला मारला जात आहे. अशातच आता सरकारने काही कर्ज देणाऱ्या एप्लीकेशन बाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
बाजारात अशा काही ऑनलाईन कर्ज देणाऱ्या एप्लीकेशन आहेत ज्या कर्ज देण्याच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या बँक खात्यावर हात साफ करत आहेत. याबाबत सायबर दोस्त या सरकारच्या पोर्टल वर माहिती देण्यात आली आहे.
सायबर दोस्त हे भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अधिनस्त काम करते. याच पोर्टलने आता ‘हनीफॉल’ एप्लीकेशन पासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. सदर पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, हनीफॉल अॅप एका खास कोडसह डिझाइन करण्यात आले आहे.
यामुळे जेव्हा हे हनीफॉल मोबाईलमध्ये डाउनलोड केले जाते तेव्हा मॅलेशियल कोडच्या मदतीने हॅकर्स फोनचा ताबा मिळवतात. एकदा की फोनचा ताबा आला की ही भामटी मंडळी फोन डेटाच्या मदतीने संबंधित मोबाईल धारकाच्या बँकेतील पैसे काढतात. अशा तऱ्हेने फसवणुकीच्या घटना घडू शकतात.
यामुळे नागरिकांनी हे एप्लीकेशन डिलीट केले पाहिजे. खरंतर सरकारने याआधीच झटपट कर्ज देणाऱ्या एप्लीकेशन पासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. यात विंडमिल मनी आणि रॅपिड रुपी प्रो या एप्लीकेशनचा देखील समावेश आहे. यामुळे तुम्हीही जर अशा एप्लीकेशन चा