Banking News : अलीकडे भारतात डिजिटल पेमेंटला मोठी चालना मिळाली आहे. यूपीआय एप्लीकेशनच्या माध्यमातून पेमेंट करणाऱ्यांची संख्या आपल्या देशात दिवसेंदिवस वाढत आहे. फोन पें, गुगल पे, पेटीएम, अमेझॉन पे यांसारख्या एप्लीकेशनचा उपयोग करून आता छोटे-मोठे सर्व प्रकारचे ट्रांजेक्शन पूर्ण केले जात आहेत.
मात्र असे असले तरी आज ही 5-10 रुपयांच्या व्यवहारासाठी कॉईन चा उपयोग होतो. तुम्हीही कुठे ना कुठे दैनंदिन कामांसाठी कॉइन चा वापर करत असाल.
अशा परिस्थितीत तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, की बँकेत आपण एका वेळी किती कॉइन जमा करू शकतो ? म्हणजेच बँकेत किती चिल्लर जमा करता येते याबाबत आरबीआयने काय नियम तयार केले आहेत असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का ? हो, तर मग आज आपण याच संदर्भात सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात चिल्लर असेल आणि ती चिल्लर तुम्हाला तुमच्या बँक खात्यात जमा करायची असेल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी.
खरेतर, देशात चलन जारी करण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर आहे. सध्या देशात एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये आणि वीस रुपयांची नाणी चलनात आहेत.
नाणी कायदा 2011 अंतर्गत, 1000 रुपयांपर्यंतची नाणी जारी केली जाऊ शकतात. आता आपण आपल्या बँक खात्यात किती नाणी जमा करू शकता या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.
खरेतर बँक खात्यात चिल्लर अर्थातच कॉइन जमा करण्यासंदर्भात रिझर्व बँकेकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
रिझर्व्ह बँकेचे असे म्हणणे आहे की, ग्राहकांना बँकेत नाणी जमा करण्याची कोणतीही मर्यादा नाहीये. बँका त्यांच्या ग्राहकांकडून कितीही नाणी स्वीकारण्यास स्वतंत्र आहेत.
याचा अर्थ तुम्ही तुमच्या बँक खात्यात कितीही मोठी रक्कम नाण्यांच्या स्वरूपात म्हणजे तुम्ही तुमच्या बँक खात्यात तुम्हाला हवी तेवढी चिल्लर जमा करू शकतात.