Banking News : मागील काही महिन्यांमध्ये देशातील काही बँकांचे लायसन्स रद्द करण्याचा मोठ्या निर्णय रिझर्व बँक ऑफ इंडियाने घेतलेला आहे. खरंतर, आपण बँकेत पैसे सुरक्षित राहतात म्हणून डिपॉझिट करत असतो.
मात्र जर एखादी बँक बुडाली तर बँकेत जमा केलेल्या पैशांचे काय होते हा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का ? हो, ना मग चिंता नका करू आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.
जर बँक बुडाली तर ग्राहकांच्या पैशांचे काय होते, बँकेतील ठेवीदारांचे पैसे त्यांना परत मिळतात का, यासंदर्भात आरबीआयचे नियम काय सांगतात ? याबाबत आज आपण सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बँक बुडाली तर ग्राहकांच्या पैशांचे काय होणार
खरंतर, देशातील प्रत्येक बँकांवर आरबीआयचा कमांड असतो. बँकांना आरबीआयच्या नियमांचे पालन करावे लागते. जर ज्या बँका नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्यावर आरबीआय दंडात्मक कारवाई करते.
बँक जर तोट्यात जात असेल तर अशा बँकेवर आरबीआयची करडी नजर राहते. ठेवीदारांचे नुकसान होऊ नये यासाठी आरबीआय योग्य तो निर्णय घेते. अशावेळी बँकांचे मर्जर केले जाते.
किंवा मग बँक दिवाळीखोर झाल्याचे जाहीर केले जाते. अशावेळी बँकेचे बँकिंग व्यवसायाचे लायसन्स देखील रद्द केले जाते. सहसा बँक डिफॉल्ट होत नाहीत म्हणजे बुडत नाहीत.
पण, जर समजा बँक बुडाली तर मग बँकेतील ठेवीदारांच्या पैशांचे काय होणार ? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की बँक बुडाल्यानंतर ठेवीदारांचे पैसे परत करण्याची जबाबदारी क्रेडिट गारंटी कॉरपोरेशन (DICGC) ची असते.
खरे तर आधी DICGC बँकेत असलेल्या ठेवीदारांच्या पैशांवर एक लाख रुपयांपर्यंतची गॅरंटी देत असे. मात्र 2020 मध्ये यात बदल झाला आणि आता ग्राहकांचा पाच लाख रुपयांपर्यंतची गॅरंटी सदर संस्थेकडून दिली जात आहे.
म्हणजेच जर तुमचे पैसे ज्या बँकेत जमा असतील आणि ती बँक जर भविष्यात बुडाली तर तुम्हाला पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळणार आहे.
म्हणजे जर तुमची बँकेत पाच लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम जमा असेल तरीदेखील तुम्हाला फक्त पाच लाख रुपये मिळणार आहेत.