Banking News : अलीकडे भारतात पैशांचे व्यवहार ऑनलाईन होऊ लागले आहेत. बहुतेक लोक पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करत आहेत. कॅशलेस व्यवहाराला सरकारने प्रोत्साहन दिल्यापासून यात आणखी वाढ झाली आहे.
फोन पें, गुगल पें इत्यादी अँप्लिकेशनने पेमेंट करण्यास प्राधान्य दिले जात आहे. मात्र असे असले तरीही चेकची उपयुक्तता आजही कायमच आहे. चेकचे महत्व कमी झालेले नाही.
आजही पैशांचे व्यवहार करतांना धनादेशचा वापर होत आहे. अनेक ठिकाणी चेकद्वारे पैसे द्यावे लागत आहेत. मात्र काही वेळा काही चुकांमुळे चेक बाऊन्स होतो.
अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून चेक बाउन्स झाल्यावर किती दंड आकारला जातो ? हा प्रश्न उपस्थित केला जातो.
दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याबाबत आरबीआयचे काय नियम आहेत या विषयी आता आपण माहिती जाणून घेणार आहोत.
नियम काय सांगतो
चेक बाऊन्स झाल्यास बँक दंड आकारते. चेक बाऊन्स होण्याचा दंड वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळा असतो. काही विशेष परिस्थितींमध्ये, चेक बाऊन्स झाल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते आणि तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते.
चेक बाऊन्स होण्यामागची कारणे कोणती आहेत, अशा प्रकरणात किती दंड आकारला जातो आणि केस कधी उद्भवते ते आम्ही तुम्हाला सांगतो. चेक बाऊन्स झाल्यास बँका दंड आकारतात.
दंड ज्या व्यक्तीने चेक जारी केला आहे त्याला भरावा लागेल. हा दंड कारणांनुसार बदलू शकतो. साधारणपणे 150 ते 750 किंवा 800 रुपयांपर्यंत दंड आकारला जातो.
भारतात चेक बाऊन्स हा गुन्हा मानला जातो. चेक बाऊन्स्ड नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट, 1881 नुसार चेक बाऊन्स झाल्यास एखाद्या व्यक्तीवर कारवाई केली जाऊ शकते.
त्याला 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा चेकच्या दुप्पट रकमेचा दंड किंवा दोन्हीही होऊ शकतात. तथापि, हे तेव्हाच घडते जेव्हा चेक देणाऱ्याच्या खात्यात पुरेशी शिल्लक नसते आणि बँक चेकचा अनादर करते.