Banking News : आपल्यापैकी अनेकांचे बँकेत अकाउंट असेल. काही लोकांचे तर एकापेक्षा अधिक बँक अकाउंट असतात. दरम्यान आजची ही बातमी बँक खातेधारकांसाठी खूपच खास राहणार आहे.
खरे तर आपण आपल्या बँक अकाउंट मध्ये आपले कष्टाचे पैसे जमा करत असतो. तुमच्याही बँक अकाउंट मध्ये तुम्ही पैसे जमा केलेले असतील.
मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की जर बँक खातेधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या अकाउंट मध्ये असणारे पैसे कोणाला मिळतात ? आरबीआय ने याबाबत काय नियम तयार केले आहेत याबाबत तुम्हाला माहिती आहे का? नाही ना, चला तर मग आज आपण याच प्रश्नाचे उत्तर थोडक्यात जाणून घेऊया.
आज आपण बँक खातेधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अकाउंट मधील पैसे कोणाला मिळू शकतात, याबाबत आरबीआयने काय नियम तयार केले आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
RBI चा नियम काय सांगतो ?
रिझर्व बँक ऑफ इंडियाने तयार केलेल्या नियमानुसार, बँक खाते असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या अकाउंटमध्ये असणाऱ्या पैशांवर त्या व्यक्तीने नॉमिनी म्हणून ज्या व्यक्तीची निवड केली असेल त्याचा अधिकार राहणार आहे. म्हणजेच मयत व्यक्तीच्या बँक खात्यांमधील पैसे सदर मयत खातेधारकाच्या नॉमिनीला दिले जातात.
जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, बँक खाते धारकाचा मृत्यू झाला की बँकेच्या नोंदींमध्ये उपस्थित असलेल्या नामनिर्देशित (नॉमिनी) व्यक्तीची ओळख आणि पडताळणी केल्यानंतर बँक खातेदाराच्या सर्व ठेवी नामनिर्देशित व्यक्तीला अर्थातच नॉमिनीला सोपवतो.
जेव्हा तुम्ही बँकेत खाते ओपन करणार तेव्हा तुम्हाला नॉमिनीचे नाव जोडावे लागते. एफडी करताना देखील नॉमिनीचे नाव जोडणे आवश्यक असते. नॉमिनी ही कुटुंबातीलच व्यक्ती राहू शकते.
तुम्ही तुमची पत्नी, आई-वडील, मुले, भावंडे, मित्र किंवा नातेवाईकांना नॉमिनी बनवू शकता. तुमचा ज्यावर विश्वास असेल तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्या बँक खात्यासाठी नॉमिनी लावू शकता.