Banking News : भारत हा विविध धर्म, जात, पंथ, संप्रदायाने नटलेला देश आहे. आपल्या देशात विविध धर्माचे लोक वास्तव्याला आहेत. देशात वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे सण मोठ्या उत्साहात साजरी केले जातात. असाच एक सण आहे होळीचा.
यंदा होळीचा सण नुकताच साजरा झाला आहे. काल होळीचा आणि आज धुलीवंदनाचा सण संपूर्ण देशात उत्साहात साजरा झाला आहे. अजूनही काही भागात हा सण मोठ्या जल्लोषात सेलिब्रेट केला जात आहे.
या सणाला खरंतर रंगाची उधळण केली जाते. जीवनात आनंदाचे रंग भरणारा हा सण आहे. पण, या आनंदाच्या उत्सवात अनेकांच्या कपडे, खिशातले पैसे, नोटा देखील रंगल्याच असतील. तुमच्याकडील नोटा देखील कदाचित या उत्सवात कलरने रंगल्या असतील.
यामुळे साहजिकच तुमच्याजवळ असलेल्या या नोटा चालतील की नाही अशी शंका तुमच्या मनात आलीच असेल. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.
होळी, धुलीवंदन, रंगपंचमी किंवा अन्य एखाद्या उत्सवात, समारंभात जर तुमच्या नोटा कलरने रंगल्या असतील अन तुम्हाला प्रश्न पडला असेल की या नोटा चालणार की नाहीत ? तर आज आपण रंगीन नोटा स्वीकारण्याबाबत आरबीआयने जारी केलेले परिपत्रक अथवा नियम थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
रंगलेल्या नोटा चालणार का ?
2017 मध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाने याबाबत एक महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित केलेले आहे. या परिपत्रकानुसार जर एखाद्या नोटवर राजकीय घोषवाक्य लिहिलेले असेल तर ती नोट चालनार नाही. अशी नोट देशातील कोणतीही बँक स्वीकारू शकत नाही.
पण जर नोट कलरने रंगलेली असेल तर ती नोट बँकेला स्वीकारावीच लागेल. बँक अशी नोट घेण्यास नकार देऊ शकत नाही. तथापि आरबीआयने भारताचे सुजाण नागरिक म्हणून आपल्या देशाचे चलन खराब होणार नाही, नोटा खराब होणार नाहीत याची काळजी घेण्याची सूचना नागरिकांना दिलेली आहे.
याशिवाय जर कोणी जाणूनबुजून नोटा फाडल्या असतील तर अशा नोटा बँकांनी स्वीकारू नयेत असेही म्हटले आहे. जाणून-बुजून फाटलेल्या नोटा ओळखणे अवघड असू शकते मात्र व्यवस्थित पाहणी केली तर या नोटा ओळखल्या जाऊ शकतात असे देखील या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
पण, जर एखाद्या व्यक्तीकडे खराब नोट असेल किंवा फाटलेली नोट असेल जी की त्याने जाणून-बुजून फाडलेली नसेल अन त्यावर सर्व आवश्यक माहिती दिसत असेल तर अशा नोटा बँकांना स्वीकाराव्या लागणार आहेत.