Banking News : जर तुमचेही बँकेत खाते असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. खरे तर आपल्या देशात अलीकडे बँक खातेधारकांची संख्या वाढली आहे. आता खेड्यापाड्यात राहणाऱ्या अशिक्षित लोकांना देखील बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यात आले आहे.
विशेषता केंद्रातील मोदी सरकारने जनधन योजना राबवल्यानंतर बँकेतील खातेधारकांची संख्या अधिक वाढली आहे. अनेकांचे तर एकापेक्षा अधिक बँक अकाउंट आहेत.
काही लोकांचे पैशांचे व्यवहार मोठे असतात त्यामुळे त्यांचे एकापेक्षा अधिक बँक अकाउंट पाहायला मिळतात. दरम्यान अनेक बँक खातेधारकांच्या माध्यमातून बँका विनाकारण त्यांच्या खात्यातून पैसे कट करत असल्याची तक्रार केली जात होती.
तर अनेकांनी त्यांच्या सेविंग अकाउंट मध्ये अर्थातच बचत खात्यामध्ये किमान शिल्लक रक्कम नसल्याने बँकेच्या माध्यमातून दंड वसूल केला गेला असल्याची तक्रार केली आहे.
खरेतर बँकेत किमान शिल्लक रक्कम ठेवणे हा बँकेचा नियमच आहे. वास्तविक, देशातील प्रत्येक बँकेच्या काही अटी आणि शर्ती असतात. या अटी आणि शर्तीनुसार बँक खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवावीच लागते.
दरम्यान बँक खात्यात किमान शिल्लक रक्कम किती ठेवायची याबाबतचा निर्णय बँकेने घेतलेला असतो. म्हणजेच किमान शिल्लक रक्कम ही बँकेच्या माध्यमातूनच ठरवली जाते. यामुळे वेगवेगळ्या बँकेची किमान शिल्लक रक्कम ही वेगवेगळी राहते.
तसेच ग्रामीण आणि शहरी भागानुसार किमान शिल्लक रक्कम बदलत असते. जर बँक खात्यात बँकेने ठरवलेली किमान शिल्लक रक्कम नसेल तर बँकेच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जाते. म्हणजेच सदर बँक खातेधारकाकडून दंड वसूल केला जातो.
मात्र आरबीआयने याबाबत एक नियम तयार केला आहे. या नियमानुसार बँक खात्यात किमान शिल्लक नसतानाही ग्राहकांच्या खात्यातून बँक कोणत्याही परिस्थितीत आणि कुठल्याही सबबीवर पैसे कापू शकत नाही. तसेच, दंडाच्या नावाखाली पैशांची कपात करून बँक ग्राहकांचे खाते नकारात्मक करू शकत नाही.
मात्र असा नियम असतानाही अनेक बँका ग्राहकांकडून दंडाची रक्कम वसूल करतांना ग्राहकांचे बँक खाते मायनस मध्ये करत आहेत. जर तुमच्या सोबतही असे झाले असेल तर तुम्ही आरबीआयकडे याबाबत तक्रार करू शकता.
आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही याविषयी तक्रार नोंदवू शकणार आहात. दरम्यान तुमची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आरबीआयच्या माध्यमातून सदर बँकेवर कारवाई केली जाऊ शकते. एवढेच नाही तर तुमची कपात केलेली रक्कमही परत होऊ शकते.