Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व बँकेने देशातील दोन मोठ्या सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचे जाहीर केले आहे. यामुळे संबंधित सहकारी बँकेतील खातेधारकांमध्ये सध्या कमालीचे भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
परवाना रद्द झाला असल्याने आता बँकेतील आपल्या कष्टाच्या पैशांचे काय होणार ? हा सवाल बँक ग्राहकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान आता आपण आरबीआयने कोणत्या दोन सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या बँकेचे परवाने केले रद्द
मिळालेल्या माहितीनुसार, आरबीआयने महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये प्रत्येकी एक-एक सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील आदर्श महिला नागरी सहकारी बँकेचा आणि गुजरात मधील द बोद पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्याचा मोठा निर्णय नुकताच निर्गमित केला आहे.
यामुळे राज्यासह गुजरात मधील सदर बँकेच्या ग्राहकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण आहे. या दोन्ही बँकेचा बँकिंग लायसन्स अर्थातच परवाना रद्द झाला असल्याने आता या संबंधित बँकांना बँकिंग कारभार करता येणार नाही.
या दोन्ही बँका आता नॉन बँकिंग वित्तीय संस्था म्हणून कारभार पाहू शकणार आहेत. परवाना रद्द झाला असल्याने आता खातेधारकांच्या ठेवी स्वीकारणे आणि ठेवींची परतफेड करणे बँकेला जमणार नाही.
शिवाय बँकांना कर्ज देखील देता येणार नाही. महाराष्ट्रातील आदर्श महिला नागरी सहकारी बँकेची आर्थिक स्थिती खूपच कमकुवत असल्याने ही बँक ग्राहकांच्या दृष्टीने धोकादायक बनली असल्याने याचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
दरम्यान या बँकेतील ग्राहकांना जमा विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.