Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशातील दोन बड्या बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. आरबीआय ने सोमवारी प्रायव्हेट सेक्टर मधील आयसीआयसीआय आणि येस बँकेवर दंडात्मक कारवाई केली होती. आयसीआयसीआय ही देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील दुसरी सर्वात मोठी बँक आहे. दरम्यान या प्रायव्हेट सेक्टरमधील बँकांवर आरबीआयने दंडात्मक कारवाई केली असल्याने सदर ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
मध्यवर्ती बँकेने आयसीआयसीआय बँकेला एक कोटी रुपयांचा आणि येस बँकेला 91 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र या कारवाईचा ग्राहकांवर कोणताच परिणाम होणार नसल्याचे म्हटले गेले आहे. दुसरीकडे आरबीआय ने आणखी एका बड्या बँकेवर कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मध्यवर्ती बँकेने HSBC या बँकेवर दंडात्मक कारवाई केली आहे. खरंतर बँकांनी नियमांचे उल्लंघन केले की आरबीआय त्यांच्यावर कारवाई करत असते. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बँकांवर दंडात्मक कारवाई केली जात असते.
विशेष म्हणजे काही बँकांचे लायसन्स देखील आरबीआयने रद्द केले आहे. HSBC या बँकेला 36.38 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात या बँकेवर दंडात्मक कारवाई करण्याचे कारण नमूद केले आहे.
मध्यवर्ती बँकेने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले गेले आहे की, विदेशी चलन व्यवस्थापन कायद्याचे म्हणजे FEMA चे उल्लंघन केल्याबद्दल एचएसबीसीला 36.38 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
एचएसबीसीने FEMA कायदा, 1999 च्या उदारीकृत रेमिटन्स स्कीम अंतर्गत आवश्यक माहिती प्रदान करण्याच्या तरतुदीचे पालन केले नाही, म्हणून ही कारवाई झाली आहे.
खरे तर या कायद्याचे उल्लंघन झाले असल्याने रिझर्व्ह बँकेने एचएसबीसीला कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावली होती. या नोटिशीला लेखी उत्तर देण्याबरोबरच बँकेने तोंडी बाजूही मांडली होती.
दरम्यान या बँकेचे लेखी उत्तर ऐकून घेतल्यानंतर मध्यवर्ती बँकेने ही कठोर कारवाई केली आहे. HSBC ने नियमांचे उल्लंघन केले असल्याचे स्पष्ट दिसले असून यामुळे सदर बँकेवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
दंडात्मक कारवाईमुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र ही दंडात्मक कारवाई बँकेवर झाली असून याचा ग्राहकांवर कोणताच परिणाम होणार नाहीये. यामुळे ग्राहकांनी चिंता करू नये असे देखील आवाहन जाणकारांनी केले आहे.
खरंतर 2024 या आर्थिक वर्षात आरबीआयने देशातील 64 बँका आणि NBFC वर दंडात्मक कारवाई केली आहे. विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदर बँकांवर कारवाई झाली आहे.