Banking News : आरबीआय हे भारत सरकारने स्थापित केलेली एक बँकिंग नियामक संस्था आहे. ही संस्था देशातील सर्वच बँकांवर लक्ष ठेवून असते. बँकेच्या कामकाजासाठी आरबीआय विशेष नियम तयार करते. या नियमांचे सदर बँकांना काटेकोर पालन करावे लागते.
ज्या बँका यांचे पालन करत नाहीत त्यांच्यावर मोठी कारवाई करण्याचा अधिकार आरबीआयला असतो. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआयने देशातील अनेक बँकांवर मोठी कठोर कारवाई केली आहे.
काही बँकांचे परवाने रद्द केले आहेत तर काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. अशातच आता आरबीआयने देशातील आणखी एका बड्या बँकेवर मोठी कठोर कारवाई केली असून या बँकेचे लायसन्स अर्थातच परवाना रद्द करण्यात आला आहे.
त्यामुळे सध्या सदर बँकेच्या खातेधारकांमध्ये मोठी भीतीचे वातावरण असून बँकेत ठेवलेल्या पैशांचे काय होणार हाच सवाल खातेधारकांकडून उपस्थित केला जात आहे. बँकेचा थेट सर्वांना रद्द झाला असल्याने आता बँकेतील पैसे बुडणार का हा सवाल ग्राहक उपस्थित करत आहेत.
कोणत्या बँकेचे लायसन्स झाले रद्द
मिळालेल्या माहितीनुसार आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने हिरीयुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे. याबाबत आरबीआय ने काल माहिती दिली आहे.
बँकेच्या खराब आर्थिक स्थितीमुळे आरबीआय ने हा निर्णय घेतला असून या बँकेच्या खातेधारकांमध्ये सध्या मोठे भीतीचे वातावरण आहे.
आरबीआय ने सांगितल्याप्रमाणे आता या बँकेला बँकिंग व्यवसाय करता येणार नाही. लायसन्स रद्द झाल्यामुळे ही बँक आता बँकिंग व्यवसाय करण्यास अक्षम राहणार आहे.
म्हणजेच सदर बँकेला आता कोणत्याही खातेधारकांकडून ठेवी स्वीकारता येणार नाहीत आणि कोणालाच ठेवी परत करता येणार नाहीत.
खातेधारकांचे पैसे बुडणार का?
डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) डीआयसीजीसी कायदा 1961 च्या तरतुदींनुसार या बँकेतील खातेधारकांना त्याच्या ठेवींच्या 5 लाख रुपयां पर्यंतची रक्कम परत मिळणार आहे. पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींच्या दाव्याची रक्कम मिळण्याचा संबंधित खातेधारकांना अधिकार प्राप्त आहे.
आरबीआय ने सांगितल्याप्रमाणे या बँकेतील 99.93% खातेधारकांना त्यांचा संपूर्ण पैसा वापस मिळणार आहे. अर्थातच काही खातेधारकांचा पूर्ण पैसा त्यांना मिळू शकणार नाही. मात्र अशा खातेधारकांची संख्या ही खूपच कमी आहे.