Banking News : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये रोकड व्यवहार कमी झाले आहेत. आता कॅशलेस इकॉनोमीला विशेष प्राधान्य दिले जात आहे. सरकारने देखील रोकड व्यवहार कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. रोकड व्यवहार करण्याऐवजी कॅशलेस व्यवहार झाले पाहिजेत यासाठी शासनाकडून सर्वसामान्यांना प्रोत्साहित केले जात आहे.
हेच कारण आहे की, आता ऑनलाइन पेमेंट करण्याला विशेष पसंती मिळत आहे. ऑनलाइन पेमेंट हे सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. बाजारात ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी गुगल पे, फोन पे, पेटीएम, अमेझॉन पे यांसारख्या विविध अप्लिकेशन देखील आल्या आहेत.
यामुळे आता यूपीआय पेमेंट वाढले आहेत. चहाची टपरी असो, भाजीपाल्याचे दुकान असो किंवा किराणा दुकान असो सर्वच ठिकाणी आता यूपीआयने पेमेंट केले जात आहे. मात्र असे असले तरी अजूनही देशात किरकोळ बाजारात रोखीने व्यवहार सुरूच आहेत.
किरकोळ रकमांसाठी अजूनही रोख व्यवहार केला जात आहे. यामध्ये ५ रुपयांचे नाणे सर्वात जास्त चलनात आले आहे. विशेष म्हणजे अजूनही पाच रुपयाचे नाणे चलनात आहे.
पण सध्या बाजारात जे नाणे उपलब्ध आहे त्याची जाडी बरीच कमी झाली आहे. आधी ५ रुपयांचे नाणे खूप जाड होते. आता खूपच बारीक नाणे तयार करण्यात आले आहे. यामुळे जुने 5 रुपयांचे जाड नाणे कुठे गेले ? हा सवाल उपस्थित केला जात आहे.
तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की जुने पाच रुपयाचे जाड नाणे रिझव्र्ह बँकेने बंद केले आहे. निश्चितच आता तुम्हाला जुने नाणे का बंद केले हाच प्रश्न पडला असेल, दरम्यान, आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.
कां बंद झाले जुने 5 रुपयांचे कॉइन
मीडिया रिपोर्टनुसार, जुन्या ५ रुपयांच्या जाड नाण्यांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली होती. जुनी ५ रुपयाची नाणी खूप जाड होती आणि ती बनवण्यासाठी जास्त धातूची गरज लागत असे. ज्या धातूपासून ही नाणी बनवली गेली, त्याच धातूपासून शेव्हिंगसाठी वापरलेली धारदार ब्लेडही बनवली जातात.
त्यामुळे लोकांनी त्याचा फायदा घेण्यास सुरुवात केली. या जुन्या 5 रुपयांच्या कॉइनमध्ये धातूचे प्रमाण जास्त असल्याने ही ५ रुपयांची नाणी अवैधरित्या बांगलादेशात तस्करी करून पाठवली जाऊ लागली.
तेथे ही नाणी वितळवून त्यांच्या धातूपासून ब्लेड तयार केले जाऊ लागले. या पाच रुपयाच्या एका नाण्यापासून 6 ब्लेड बनवले जात आणि एक ब्लेड 2 रुपयांना विकले जाते. म्हणजे 5 रुपयांचे नाणे वितळवून ब्लेड बनवून 12 रुपये घडवले जाऊ लागले.
मात्र या काळाबाजारीमुळे बाजारातून या नाण्यांची संख्या कमी होऊ लागली. बाजारात जुन्या पाच रुपयांच्या नाण्याचा मोठा शॉर्टेज येऊ लागला. तेव्हा मग RBI ला या गोष्टीची चाहूल लागली. मग काय जुने पाच रुपयाचे नाणे आरबीआयने बंद करण्याचा निर्णय घेतला.