Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. खरे तर गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआयने देशातील अनेक बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. एवढेच नाही तर काही बँकेचा परवाना म्हणजेच लायसन्स देखील रद्द केले आहे.
यामुळे या सदर लायसन्स रद्द झालेल्या बँकेला आता बँकिंग व्यवसाय करता येणार नाहीये. यामुळे बँक खातेधारकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण आहे.
अशातच आरबीआयने नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून देशातील पाच बड्या बँकांवर कारवाई करण्यात आली आहे.
देशातील पाच महत्त्वाच्या बँकांवर आरबीआयने दंडात्मक कारवाई केली असून यामुळे या सदर बँकेतील खातेधारकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळाले आहे.
दरम्यान, आता आपण आरबीआयने कोणत्या पाच बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे आणि यामुळे सदर बॅंकेच्या ग्राहकांवर काय परिणाम होणार ? ग्राहकांचे देखील पैसे कापले जाणार का ? इत्यादी बाबींची सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या बँकांवर झाली दंडात्मक कारवाई
मनी कंट्रोल ने दिलेल्या एका वृत्तानुसार, रिझर्व बँक ऑफ इंडियाने मंडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, राजापालयम को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक, उत्कृष्ट सहकारी बँक, स्टँडर्ड अर्बन को-स्टँडर्ड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आणि हावडा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर नुकतीच दंडात्मक कारवाई केली आहे. RBI ने दंडात्मक कारवाई केल्यामुळे सदर बँकेच्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कितीचा दंड ठोठावला
आम्ही आपणास सांगू इच्छितो की रिझर्व बँक ऑफ इंडिया ने मंडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला 6 लाख रुपये, हावडा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि उत्कृष्ट सहकारी बँकेला प्रत्येकी 1 लाख रुपये, राजापालयम को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेला 75,000 रुपये आणि स्टँडर्ड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला 50,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
ग्राहकांवर काय परिणाम होणार ?
मध्यवर्ती बँकेने याआधी देखील अनेक बँकांवर अशी दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र या दंडात्मक कारवाईचा ग्राहकांवर कोणताच विपरीत परिणाम होत नाही. बँका आरबीआयच्या नियमांचे पालन करत नाही यामुळे ही कारवाई केली जाते.
याचा बँक ग्राहकांवर कोणताच विपरीत परिणाम होत नाही. बँक ग्राहकांचे कोणतेच पैसे कपात केले जात नाहीत.
परिणामी आरबीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे ग्राहकांना कोणताच फटका बसणार नाहीये. तसेच सदर निर्णयामुळे या सदर बँकेच्या बँकिंग व्यवसायावर देखील काहीही विपरीत परिणाम होणार नाही.