Banking News : रिझर्व बॅंक ऑफ इंडिया अर्थातच आरबीआयने नुकताच एक कठोर निर्णय घेतला आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकतीच तीन वित्तीय संस्थांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामुळे सदर वित्तीय संस्थांच्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळते.

खरे तर गेल्या काही महिन्यांपासून आरबीआयने देशातील अनेक बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यातील काही बँकांचे लायसन्स देखील आरबीआयकडून रद्द करण्यात आले आहे. देशातील सर्व खाजगी, सहकारी आणि सरकारी बँकांना आरबीआयच्या नियमांचे पालन करावे लागते.

Advertisement

ज्या बँका आरबीआयच्या नियमांचे पालन करत नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होत असते. बँकांचे लायसन्स रद्द करण्याचा अधिकार देखील आरबीआयला आहे. दरम्यान आरबीआयने नुकताच देशातील तीन बड्या वित्तीय संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देशाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने व्हिसा वर्ल्डवाइड, ओला फायनान्शिअल सर्व्हिस आणि मणप्पुरम फायनान्स कंपनीला दंड ठोठावला आहे. दरम्यान, आता आपण या तीन कंपन्यांकडून आरबीआय कितीचा दंड आकारणार याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

Advertisement

कोणत्या कंपनीकडून किती दंड वसूल होणार?

आरबीआयने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले असून यामध्ये व्हिसा वर्ल्डवाइड प्रायव्हेट लिमिटेडवर 2.4 कोटी आणि मणप्पुरम फायनान्स लिमिटेडवर 41.5 लाखांचा दंड ठोठावला असल्याची माहिती केंद्रीय बँकेने सार्वजनिक केली आहे.

Advertisement

तसेच ओला फायनान्शिअल सर्व्हिसवर दोन वेगवेगळ्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने 33.40 लाख रुपये आणि 54.15 लाखांचा दंड ठोठावला आहे. पीएसओ मणप्पुरम आणि ओला फायनान्शिअल सर्व्हिसेसने आपल्या ग्राहकांचं केवायसी केली नव्हती यामुळे आरबीआयने या कंपनीवर दंडात्मक कारवाई केली.

व्हिसा वर्ल्डवाइड प्रायव्हेट लिमिटेडवर दंड ठोठावण्याच कारण असे की केंद्रीय बँकेकडून मंजुरी न घेताच सदर वित्तीय संस्थेने पेमेंट ऑथेंटिफिकेशन सॉल्यूशन लागू केलं होत. हे आरबीआयच्या नियमांच्या बाहेर आहे.

Advertisement

एकंदरीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदर तिन्ही बँकांवर आरबीआयने कारवाई केली आहे. मात्र या कारवाईचा ग्राहकांवर कोणताच विपरीत परिणाम होणार नाही. या वित्तीय कंपन्यांच्या सुविधा आधी प्रमाणेच ग्राहकांसाठी उपलब्ध राहणार आहे.

आरबीआयकडून आकारला जाणारा हा दंड सदर वित्तीय कंपन्यांकडून आकारला जाणार असून ग्राहकांकडून कोणतीही रक्कम आकारली जाणार नसल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे. यामुळे ग्राहकांनी चिंता करण्याचे काहीही कारण नाही.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *