Banking News : रिझर्व बँक ऑफ इंडिया अर्थातच आरबीआय देशभरातील बँकांवर लक्ष ठेवून असते. देशातील सर्वच खाजगी, सरकारी, सहकारी आणि स्मॉल फायनान्स बँक तसेच एन बी एफ सी कंपन्यांवर आरबीआयचे लक्ष असते. या सर्व वित्तीय संस्थांना आरबीआयच्या नियमांचे पालन करावे लागते. ज्या बँका किंवा वित्तीय संस्था आरबीआयच्या नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई देखील होत असते.

नियमांचे उल्लंघन केल्यास आरबीआय बँकांवर दंडात्मक कारवाई करते. तसेच काही बँकांचे मध्यवर्ती बँकेकडून लायसन्स देखील कॅन्सल केले जाते. गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआयकडून देशातील अनेक बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तर काही बँकांचे लायसन्स देखील आरबीआयने रद्द केले आहे.

Advertisement

आरबीआयने सर्वात जास्त सहकारी बँकांचे लायसन्स रद्द केले आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात आरबीआयने महाराष्ट्रातील एका प्रमुख सहकारी बँकेचे लायसन्स रद्द केले आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई स्थित सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रिझर्व बँकेने रद्द केला आहे.

सिटी को-ऑपरेटिव्ह बँक ही एक खाजगी सहकारी बँक आहे. आरबीआयने या बँकेची आर्थिक परिस्थिती पाहता तिचा परवाना रद्द केला आहे. RBI ने आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की, या बँकेकडे पैसा शिल्लक राहिलेला नाही.

Advertisement

त्यामुळे भविष्यात बँकेला उत्पन्न मिळणार नाही. म्हणजे सदर बँकेकडुन बॅंकींग सांख्यिकी अधनियम 1949 च्या नियमांचे पालन होत नव्हते. यामुळे या बँकेचा परवाना रद्द झाला आहे. परवाना रद्द झाल्यानंतर सदर बँकेने आपला बँकिंग व्यवसाय बंद केला आहे.

या बँकेकडे नियमाप्रमाणे शिल्लक रक्कम नव्हती शिवाय भविष्यात बँकेकडे पैसे येण्याची देखील शक्यता नव्हती. यामुळे या बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे. जर या बँकेला पुढेही व्यवहार करण्याची परवानगी दिली असती तर ग्राहकांवर याचा विपरीत परिणाम झाला असता.

Advertisement

ग्राहकांचे आर्थिक हित धोक्यात आले असते. हेच कारण आहे की या बँकेचा परवाना रद्द झाला आहे. तथापि या बँकेच्या ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळू शकणार आहे. 

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *