Banking News : देशात सध्या 50 कोटींपेक्षा अधिक लोकांचे बँकेत खाते आहे. म्हणजेच देशाची जवळपास निम्मे जनसंख्या ही बँकेशी जोडली गेली आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य लोकांना बँकेसोबत जोडण्यासाठी 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील विशेष प्रयत्न केले आहेत.
सरकारच्या प्रयत्नांमुळेच आज करोडो लोक बँकेसोबत जोडले गेले आहेत. आपल्यापैकी असे अनेक लोक असतील ज्यांच्याकडे एक नव्हे तर दोन किंवा दोन पेक्षा अधिकही बँक खाते असतील. खरे तर बँक अकाउंटमध्ये सर्वजण आपल्या मेहनतीचा पैसा जमा करतात.
बँकांमधील पैशांवर बँकेकडून व्याज देखील मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बँकेतील पैसे सुरक्षित असतात. बँकेत पैशांची चोरी होऊ शकत नाही. यामुळे सर्वसामान्य आपला पैसा सुरक्षित राहावा आणि साठवलेल्या पैशांवर व्याज देखील मिळावे यासाठी बँकेत पैसा जमा करतात.
मात्र, बँकेत पैसा सुरक्षित राहत असला तरी देखील काही बँका दिवाळखोर होतात म्हणजेच बंद पडतात. अशावेळी बँकेतील खातेधारकांचे मोठे नुकसान होत असते.
खरे तर बँक बंद पडल्यानंतर आरबीआयच्या स्वमालकीच्या एका कंपनीच्या माध्यमातून बँक खातेधारकांना एका ठराविक लिमिट पर्यंतची रक्कम परत केली जात असते.
बँक खातेधारकांना बँक बंद पडली तर पाच लाखांपर्यंतची रक्कम मिळत असते. मात्र पाच लाख रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम बँकेत असेल तर अशावेळी बँक खातेधारकांची गळचेपी होण्याची शक्यता असते.
अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून देशातील सर्वात सुरक्षित बँका कोणत्या याविषयी प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान आरबीआय ने स्वतः या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. आरबीआयने देशातील 3 बँकांना सर्वाधिक सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.
विशेष म्हणजे यामध्ये दोन खाजगी बँकांचा समावेश आहे आणि एक बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या आठवड्यात देशांतर्गत प्रणालीगत महत्त्वाच्या बँकांच्या (D-SIBs) श्रेणीमध्ये देशातील तीन बँकांचा समावेश केला आहे.
या श्रेणीमध्ये देशातील सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या तीन बँकांचा समावेश करण्यात आला आहे. याचा अर्थ SBI, ICICI आणि HDFC बँक या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सर्वात महत्त्वाच्या बँकिंग संस्था आहेत.
म्हणजेच या बँका सर्वाधिक सुरक्षित असून या बँका कधीच बुडणार नाहीत, बंद पडणार नाहीत असा याचा सोप्या भाषेत अर्थ होतो. विशेष म्हणजे या यादीत एक सरकारी आणि दोन खाजगी बँकांची नावे असल्याने खाजगी बँकांचे महत्त्व आणि सुरक्षितता देखील या निमित्ताने अधोरेखीत होत आहे.