Banking News : तुमचेही बँकेत सेविंग अकाउंट आहे ना? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. खरतर, अलीकडे भारतात बचत खात्यांची संख्या वाढली आहे. सेविंग अकाउंट मध्ये आपण सर्वजण आपल्या बचतीचा पैसा जमा करत असतो. सेविंग अकाउंट मध्ये जमा केलेल्या रकमेवर बँकेकडून व्याज देखील मिळते. घरात पैसे ठेवण्यापेक्षा आपण सेविंग अकाउंट मध्ये पैसा जमा करतो.
मात्र, अनेकांच्या माध्यमातून बँकेच्या सेविंग अकाउंट मध्ये जास्तीत जास्त किती रक्कम ठेवता येते असा प्रश्न विचारला जात होता. दरम्यान आज आपण याच संदर्भात माहिती पाहणार आहोत. खरे तर बँकेत सेविंग अकाउंट ओपन करण्यासाठी पैसे लागत नाहीत.
पण सेविंग अकाउंट मध्ये बँकेने ठरवून दिल्याप्रमाणे मिनिमम बॅलन्स मेंटेन करावा लागतो. जे ग्राहक बँकेने ठरवल्याप्रमाणे मिनिमम बॅलन्स सेविंग अकाउंट मध्ये ठेवत नाहीत त्यांना पेनल्टी द्यावी लागते.
म्हणजे अशा ग्राहकांकडून दंड आकारला जात असतो. दरम्यान आता आपण सेविंग अकाउंट मध्ये ग्राहक जास्तीत जास्त किती रक्कम डिपॉझिट करू शकता याबाबतचे बँकेचे नियम थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बँकेचे नियम काय आहेत?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेच्या सेविंग अकाउंट मध्ये जास्तीत जास्त किती रक्कम जमा केली जाऊ शकते या संदर्भात कोणतेच नियम नाहीयेत. म्हणजे ग्राहक त्याच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे पैसे तो सेविंग अकाउंट मध्ये जमा करू शकतो.
मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की जेव्हा तुमच्या सेविंग अकाउंट मध्ये एका आर्थिक वर्षात दहा लाखांपेक्षा अधिकची रक्कम जमा होत असते तेव्हा सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेज म्हणजेच सीबीडीटीला बँकेकडून माहिती दिली जात असते.
एफडी, कॅश डिपॉझिट, म्युच्युअल फंड, बाँड आणि शेअरमधील गुंतवणुकीवर देखील सेम असाच नियम लागू आहे. बँक खातेधारक आपल्या सेविंग अकाउंट मध्ये कितीही रक्कम जमा करू शकतो. मात्र सेविंग अकाउंट मध्ये जो पैसा जमा असतो त्या पैशांवर मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस द्यावा लागतो.
अशा प्रकरणांमध्ये दहा टक्के टीडीएस कापला जातो. मात्र आयकर कायद्यानुसार प्रत्येक व्यक्तीला दहा हजार रुपये पर्यंत टीडीएस सवलत मिळते. अर्थातच दहा हजार रुपयांपेक्षा कमी व्याज जर असेल तर त्यावर टीडीएस सवलत मिळते.
ज्येष्ठ नागरिकांना मात्र पन्नास हजार रुपये पर्यंत व्याज सवलत मिळते. पण, एका आर्थिक वर्षात दहा लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम सेविंग अकाउंट मध्ये जमा झाल्यास आयकर विभागाकडून चौकशी केली जाते.
चौकशी दरम्यान जर तुम्ही जमा केलेली रक्कम ही कायदेशीर मार्गाने कमावलेली असेल, ही रक्कम तुमची स्वतःची असेल आणि याबाबत तुमच्याकडे सर्व प्रूफ असतील तर तुमच्यावर कोणतीच कारवाई होणार नाही. मात्र जर आयकर विभागाला समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर अशावेळी कारवाई होत असते.