Banking News : तुमचेही बँकेत खाते आहे ना? मग तुमच्यासाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. खरे तर आपल्यापैकी अनेकांचे बँकेत सेविंग अकाउंट असेल. सर्वसामान्य लोक सेविंग अकाउंट ओपन करतात. ज्या लोकांचे पैशांचे व्यवहार अधिक असतात असे लोक करंट अकाउंट ओपन करतात.
दरम्यान ज्या लोकांचे सेविंग अकाउंट असते त्यांना बँकेत किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागते. जर बँक खात्यात किमान शिल्लक रक्कम नसेल तर बँकांच्या माध्यमातून संबंधित खातेधारकांकडून दंड वसूल केला जात असतो.
यामुळे जर तुमचेही एकापेक्षा अधिक बचत खाते असतील तर तुम्हाला सर्वच बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागणार आहे. जर तुम्ही किमान शिल्लक रक्कम सेविंग अकाउंट मध्ये ठेवली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. यामुळे सर्वसामान्यांना एकापेक्षा जास्त बचत खाते खोलू नये असा सल्ला दिला जात आहे.
वास्तविक सेविंग अकाउंट मध्ये किमान शिल्लक रक्कम ठेवण्याबाबत आरबीआयने कोणताच नियम तयार केलेला नाही. हे सर्व नियम संबंधित बँकेच्या माध्यमातून ठरवले जातात. त्यामुळे वेगवेगळ्या बँकेत किमान शिल्लक रक्कमेची मर्यादा वेगवेगळी असते.
मात्र ज्या लोकांनी झिरो बॅलन्स अकाउंट ओपन केले असेल अशा लोकांना खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची गरज नाही. तथापि आज आपण रेगुलर सेविंग अकाउंट असलेल्या बँक खातेधारकांना बँकेनुसार किती किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागते ? याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. देशात एकूण 12 पीएसबी अर्थातच पब्लिक सेक्टर बँक असून या बारामध्ये एसबीआय बँकेचा देखील समावेश होतो. जर तुमचे एसबीआय मध्ये बचत खाते असेल तर तुम्हाला तुमच्या बचत खात्यात एक हजार रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंतची रक्कम किमान शिल्लक बॅलन्स म्हणून ठेवावी लागणार आहे.
जर तुमचे खाते शहरी भागात असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये, निमशहरी भागात असेल तर दोन हजार रुपये आणि ग्रामीण भागात असेल तर एक हजार रुपयांची किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागणार आहे.
HDFC : ही देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक सर्वात सुरक्षित बँकांच्या यादीत येते. जर तुमचे शहरी भागात एचडीएफसीचे सेविंग अकाउंट ओपन केलेले असेल तर दहा हजार रुपये, निम शहरी भागात असेल तर पाच हजार रुपये आणि ग्रामीण भागात असेल तर अडीच हजार रुपये एवढे किमान शिल्लक बॅलन्स ठेवावे लागणार आहे.
Yes Bank : या बँकेने देखील आपल्या ग्राहकांसाठी किमान शिल्लक रकमेबाबत नियम तयार केले आहेत. या बँकेत बचत खाते असलेल्या खातेधारकांना दहा हजार रुपये किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागते.
ICICI : ही देखील खाजगी क्षेत्रातील एक मोठी बँक आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बँकेत शहरी भागात बचत खाते असलेल्या खातेधारकांना दहा हजार रुपये, निमशहरी भागात खाते असल्यास पाच हजार रुपये आणि ग्रामीण भागात खाते असल्यास दोन हजार रुपये किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागते.