Banking News : अलीकडे रोकड व्यवहार खूपच कमी झाले आहेत. कॅशने व्यवहार करण्याऐवजी डिजिटल व्यवहाराला प्राधान्य दिले जात आहे. कोणाला पैसे देणे असो किंवा कोणाकडून पैसे घेणे असो आता लोक कॅशने व्यवहार करण्याऐवजी डिजिटल व्यवहाराला प्राधान्य देत आहेत.
यात चेकमध्ये पेमेंट घेणाऱ्यांची आणि चेकने पेमेंट करणाऱ्यांची संख्या देखील खूपच उल्लेखनीय आहे. मात्र असे असले तरी डिजिटल व्यवहार करताना अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकजण डिजिटल व्यवहारांमध्ये लोकांची फसवणूक देखील करत आहेत.
दरम्यान काही लोकांकडून त्यांना देण्यात आलेला चेक बाउन्स झाल्याचे सांगितले गेले आहे, तसेच जर एखाद्याने चेक दिला आणि तो चेक बाउन्स झाला तर काय केले पाहिजे? असा प्रश्न देखील अशा लोकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. अशा स्थितीत आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आज आपण जर एखाद्याने एखाद्या व्यक्तीस चेक दिला असेल मात्र तो चेक बाउन्स झाला तर काय केले पाहिजे याविषयी थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
चेक बाउन्स झाला तर काय कराल?
जर समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीने कॅश पेमेंट करण्याऐवजी चेक दिला असेल आणि तो चेक बाउन्स झाला असेल तर तुम्ही अशा व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई करू शकता. अशा प्रकरणांमध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 नुसार सदर व्यक्ती विरोधात कारवाई केली जाऊ शकते.
या ॲक्टमधील कलम 138 नुसार अशा करणाऱ्या व्यक्तीला दोन वर्षांपर्यंतची शिक्षा आणि सोबतच दंड देखील ठोठावला जाऊ शकतो. जर तुम्हाला देण्यात आलेला चेक बाउन्स झाला असेल आणि चेक देणारा व्यक्ती पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत असेल तर तुम्ही चेक देणाऱ्या व्यक्ती विरोधात तीस दिवसांच्या आत एक लीगल नोटीस पाठवू शकता.
जर नोटीस बजावून पंधरा दिवस झालेत आणि तरीही त्या व्यक्तीने पैसे दिले नाहीत तर तुम्ही नोटीस बजावल्यानंतर तीस दिवसांच्या आत सदर व्यक्तीच्या विरोधात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट 1881 च्या कलम 138 नुसार गुन्हा दाखल करू शकता. यानंतर मग सदर व्यक्तीच्या विरोधात योग्य ती कारवाई केली जाईल आणि तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील.