Banking News : भारतात अलीकडे बँक खातेधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. केंद्र शासनाने जनधन योजना जाहीर केल्यानंतर बँक खातेधारकांची संख्या सर्वाधिक वाढली असल्याचे समोर आले आहे. आता देशातील जवळपास प्रत्येकच व्यक्तीचे बँकेत खाते आहे.
क्वचितच अशी एखादी व्यक्ती असेल जिचे बँकेत एकही खाते नाही. लोकांचे तर बँकेत दोन-दोन खाते आहेत. काही जणांचे दोनपेक्षा जास्त बँक अकाउंट देखील पाहायला मिळतात. खरंतर बँक अकाउंट चे वेगवेगळे प्रकार आहेत.
सॅलरी अकाउंट, सेविंग अकाउंट, करंट अकाउंट इत्यादी बँक खात्यांचे प्रकार आहेत. लोकं आपल्या गरजेनुसार या प्रकारातील बँक खाते ओपन करतात. पगारदार लोक सॅलरी अकाउंट उघडतात तर सर्वसामान्य लोक प्रामुख्याने सेविंग अकाउंट ओपन करतात.
बँक अकाउंट हे प्रामुख्याने पूर्वीच्या काळात असलेल्या तिजोरी प्रमाणे काम करते. तिजोरीत पैसा ठेवण्यापेक्षा लोक बँक अकाउंट मध्ये पैसा ठेवतात. तसेच बँकेतून सहजतेने दुसऱ्या लोकांना पैसे ट्रान्सफर होत असल्याने बँक खात्यांची उपयुक्तता वाढत चालली आहे.
आता ऑनलाइन पेमेंटचा पर्याय ग्राहकांकडे उपलब्ध झाला असल्याने कोणालाही पैसे पाठवायचे असतील तर एका क्लिकवर पैसे पाठवले जात आहेत. त्यामुळे साहजिकच बँक अकाउंटचा सर्वसामान्यांना मोठा फायदा मिळत आहे.
पण, काही वेळा बँका बुडतात. अशा परिस्थितीत लोकांचा अशा बँकेत ठेवलेला पैसा बुडतो. यामुळे अनेकांच्या माध्यमातून देशातील सर्वाधिक सुरक्षित बँक कोणती असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता लोकांच्या या प्रश्नाचे उत्तर थेट आरबीआयनेचं दिले आहे.
आरबीआयने देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकेची यादी जाहीर केली आहे. विशेष बाब म्हणजे या सुरक्षित बँकेच्या यादीत एक सरकारी आणि दोन खाजगी बँकेचा समावेश आहे.
देशातील सर्वाधिक सुरक्षित बँका कोणत्या
मिळालेल्या माहितीनुसार रिझर्व बँक ऑफ इंडियाने डोमेस्टिक सिस्टमली इम्पॉर्टंट बँक्स 2022 च्या नावाने एक यादी जारी केली आहे. या यादीत देशातील सर्वात सुरक्षित बँकांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
म्हणजेच या बँका कधीच बुडणार नाही असे सांगितले जात आहे. RBI ने जाहीर केलेल्या या सर्वात सुरक्षित बँकांच्या यादीत सार्वजनिक क्षेत्रातील एका सर्वात मोठ्या बँकेचा समावेश आहे. तसेच 2 खाजगी बँकांची नावे यामध्ये समाविष्ट आहेत.
आरबीआयने सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेचा या यादीत समावेश केला आहे. म्हणजेच एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या दोन खाजगी बँका आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ही सरकारी बँक देशातील सर्वात सुरक्षित बँका आहेत.