Banking News : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने कोल्हापूर येथील इचलकरंजी स्थित शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेड या सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
आरबीआयने या बँकेवर कठोर कारवाई केल्यामुळे बँकेतील खातेदारकांमध्ये मोठ्या भितीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या सदर बँकेचा काल परवाना रद्द झाला असल्याने आता या बँकेला कोणतीही बँकिंग सेवा देता येणार नाही.
या बँकेत आता ग्राहकांना ठेवी ठेवता येणार नाहीत. शिवाय पैसे देखील काढता येणार नाहीत. या बँकेला आता कोणत्याच ग्राहकांना कर्ज देता येणार नाही.
अशा परिस्थितीत आता या बँकेतील ग्राहकांना त्यांचे पैसे कसे मिळणार, बँक दिवाळखोरीत निघाल्यानंतर किंवा परवाना रद्द झाल्यानंतर बँकेतील ठेवी परत करण्याबाबत आरबीआयचा काय नियम आहे याबाबत सर्वसामान्यांना माहिती असणे आवश्यक आहे.
यामुळे आता आपण जर एखादी बँक दिवाळखोरीत निघाली तर त्या बँकेत पैसे असलेल्या खातेधारकांना त्यांचे पैसे कसे परत मिळणार याबाबत आरबीआयचा नियम काय सांगतो ? याविषयी जाणून घेणार आहोत.
बँक दिवाळखोरीत निघाल्याचे केव्हा जाहीर होते ?
जेव्हा बँकेकडे मालमत्तेपेक्षा जास्त दायित्वे असतात आणि गुंतवणूकदार त्यांचे पैसे काढू लागतात, तेव्हा बँकेची आर्थिक परिस्थिती बिघडते. बँकेची स्थिती खालावली आहे आणि ती ग्राहकांप्रती असलेली आपली जबाबदारी पूर्ण करू शकत नाही.
या प्रकरणात, बँकेला दिवाळखोर घोषित केले जाते. याला बँक सिंकिंग म्हणतात. असे झाल्यास बँकेत असलेले खातेधारकांचे पैसे त्यांना परत मिळतात का ? हा मोठा प्रश्न असतो. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की बँक दिवाळखोरीत निघाली तर बँक खातेधारकांचे पैसे त्यांना परत केले जातात.
बँक दिवाळीखोरीत निघाल्यास किती पैसे परत मिळतात?
खरेतर, बँकेतील ग्राहकांना ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कायद्यांतर्गत ठेवींवर विमा संरक्षण मिळते. पूर्वी बँक ठेवींवर ठेव विमा 1 लाख रुपये होता, परंतु आता तो 5 लाख रुपये करण्यात आला आहे, म्हणजे बँक दिवाळखोर झाल्यानंतर ग्राहकांना 5 लाख रुपयांची सुरक्षित रक्कम परत केली जाईल.
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी बँकेत पूर्णपणे सुरक्षित राहतील आणि बँक दिवाळखोरीत निघाल्या तरी खातेदारांना त्या उपलब्ध असतील.
म्हणजेच जर एखादि बँक दिवाळीखोरीत निघाले आणि एखाद्या खात्यात धारकाचे पाच लाख रुपयाची गुंतवणूक त्या बँकेत असेल तर त्याला त्याची संपूर्ण रक्कम या ठिकाणी परत मिळवता येणार आहे.