Best Course After 12th : नुकताच महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या बारावीच्या निकालाची आतुरता होती. अखेरकार राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक अशी कामगिरी केली आहे. अनेकांनी बारावी बोर्डाच्या परीक्षेत चांगले यश मिळवले आहे.
यामुळे सदर विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. तथापि, बारावीचा निकाल लागला, चांगले मार्क्सही मिळाले पण आता पुढे करायचे काय ? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. अनेकांची बारावीनंतर लगेचच छोटा मोठा कोर्स करून नोकरी करण्याची इच्छा असते.
दरम्यान, जर तुमचीही अशीच इच्छा असेल आणि तुम्हाला बारावीनंतर लगेच एखादा कोर्स करून चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी बारावीनंतरचे बेस्ट कोर्सेस कोणते आहेत याविषयी महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
ॲनिमेशन : अलीकडे ॲनिमेशनला मोठा स्कोप आला आहे. ॲनिमेशन डिझाईनिंगचा कोर्स करून अनेकांना चांगली नोकरी मिळाली आहे. तुम्हालाही बारावीनंतर पटकन नोकरी हवी असेल तर तुम्ही ॲनिमेशन डिझाईनिंगचा कोर्स करू शकता. ॲनिमेशन डिझायनिंगसाठी महाराष्ट्रात अनेक शैक्षणिक संस्था सर्टिफिकेट कोर्स पासून ते डिप्लोमा कोर्स ऑफर करत आहेत. हे कोर्स केल्यास विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते.
इंटेरियर डिझाईनिंग : इंटेरियर डिझाईनिंगचा ऑप्शन देखील फायदेशीर ठरणार आहे. बारावीनंतर इंटेरियर डिझाईनिंग चा कोर्स करून तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकता. महाराष्ट्रात अशा अनेक शैक्षणिक संस्था आहेत ज्या की इंटेरियर डिझाईनिंग कोर्स ऑफर करत आहेत. हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना 25 ते 30 हजार रुपयांची नोकरी सहजतेने मिळू शकते. विशेष म्हणजे अनुभव आल्यास पगारात आणखी वाढ होणार आहे.
प्रोग्रॅमॅटिक, वेबसाइट, सॉफ्टवेअर डिझायनिंग : तुम्ही बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला असाल तर तुम्हाला प्रोग्रॅमॅटिक, वेबसाइट, सॉफ्टवेअर किंवा ॲप डिझाइनिंगचा कोर्स देखील करता येणार आहे. तुम्ही जर विज्ञान शाखेतून शिक्षण घेतले असेल तर तुम्ही याचा शॉर्ट टर्म कोर्स करू शकता. हे कोर्स केल्यानंतर किमान 3.50 लाख रुपयांच्या पॅकेजेसह तुम्हाला नोकरी मिळू शकते. विशेष म्हणजे नोकरीमध्ये अनुभव मिळाल्यानंतर तुम्हाला आणखी चांगला पगार मिळणार आहे.
फॅशन डिझाईन : फॅशन डिझाइनिंगचा कोर्सही तुमच्यासाठी एक फायदेशीर पर्याय ठरणार आहे. देशभरात अशा अनेक शैक्षणिक संस्था आहेत ज्या की फॅशन डिझायनिंगचा कोर्स ऑफर करत आहेत. याचा तुम्ही सर्टिफिकेट कोर्स करू शकता किंवा डिप्लोमा देखील केला जाऊ शकतो. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला सहजतेने 25 ते 30 हजार रुपयांची नोकरी मिळू शकते.
हॉटेल मॅनेजमेंट : हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स बारावी नंतर केला जाऊ शकतो. विविध शैक्षणिक संस्था हॉटेल मॅनेजमेंट कोर्स ऑफर करत आहेत. महाराष्ट्रातही अशा अनेक संस्था आहेत जेथे तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट करू शकता. किंवा तुम्ही राज्याबाहेरही हॉटेल मॅनेजमेंट शिकू शकता. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला देशात तसेच विदेशात देखील नोकरी करता येणे शक्य होणार आहे. जर तुम्ही विदेशात गेलात तर नक्कीच तुम्हाला जास्तीचा फायदा होणार आहे.