Best Places To Invest In Real Estate : प्रत्येकाचे आपले स्वतःचे, एक हक्काचे घर असावे जिथे आपले उर्वरित आयुष्य मनमुरादपणे जगता यावे असे स्वप्न असते. अनेक लोक याच स्वप्नासाठी अहोरात्र काबाडकष्ट करतात. मात्र, घरांच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या किमती अनेकांना या स्वप्नापासून अजूनही लांबच ठेवून आहेत.
खरंतर काही लोक वास्तव्यासाठी घर खरेदी करतात तर काही लोक प्रॉपर्टी म्हणून म्हणजेच इन्व्हेस्टमेंट म्हणून घराची खरेदी करतात. विशेष म्हणजे घरांमध्ये केलेली गुंतवणूक अर्थातच रियल इस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक नेहमीच चांगला परतावा देणारी ठरली आहे. शिवाय रिअल इस्टेट मधील गुंतवणूक ही जवळपास रिस्क फ्री म्हणून ओळखली जाते.
हेच कारण आहे की, अलीकडील काही वर्षांमध्ये रियल इस्टेट मधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष असे की रियल इस्टेट मधील गुंतवणुकीने गुंतवणूकदारांना चांगले मालामाल सुद्धा बनवले आहे. यामुळे आता रियल इस्टेट क्षेत्रात आधीच्या तुलनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
दरम्यान, रिझर्व बँक ऑफ इंडिया अर्थातच आरबीआयने नुकताच एक महत्त्वाचा अहवाल सादर केला आहे. आरबीआयने हाऊस प्राईस इंडेक्स म्हणजेच गृह किंमत निर्देशांक जारी केला आहे. यामध्ये टीअर 1 आणि टीआर 2 शहरांमधील मालमत्तेच्या परताव्याचे आकडे देखील देण्यात आले आहेत. या आकडेवारीनुसार देशातील कोची या शहराने सर्वाधिक मालमत्ता परतावा म्हणजेच प्रॉपर्टी रिटर्न देण्याची किमया साधली आहे.
रिझर्व बॅंकेच्या सदर अहवालानुसार देशातील काही टीआर 2 शहरांमधील मालमत्तेने गेल्या पाच वर्षांच्या काळात तब्बल 33% पर्यंतचा परतावा दिला आहे. मागील पाच वर्षाचा विचार केला असता देशातील गुडगाव, अहमदाबाद, इंदोर, पुणे, जयपुर, कोची या पाच टियर 2 शहरात मालमत्तेच्या किमती सरासरी 33 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.
साहजिकच, ज्या लोकांनी गेल्या 5 वर्षांच्या काळात या शहरांमध्ये रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक केली आहे त्या लोकांना या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळाले असेल यात शंकाच नाही. दरम्यान, दिल्ली एनसीआर, मुंबई, बंगलोर, पुणे, हैदराबाद, चेन्नई, कोलकत्ता, अहमदाबाद ही आठ शहरे रियल इस्टेट मध्ये गुंतवणूकीसाठी खूपच फायदेशीर ठरली आहेत.
येथे ज्या गुंतवणूकदारांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना गेल्या काही वर्षांच्या काळात चांगला परतावा मिळाला आहे. यामुळे जर आपणासही रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही या शहरांमध्ये प्रॉपर्टी खरेदी करून रियल इस्टेट मध्ये तुमची गुंतवणूक सुनिश्चित करू शकता. तथापि कोणत्याही प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या वित्तीय सल्लागाराचा एकदा अवश्य सल्ला घ्या.