Bike Loan Default : आपल्यापैकी अनेकांचे नवीन गाडी घेण्याचे स्वप्न असते. अलीकडे मात्र गाड्यांच्या किमती खूपच वाढले आहेत. टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो प्रत्येकच गाडीची किंमत आधीच्या तुलनेत महागली आहे. यामुळे अलीकडे अनेक जण हफ्त्याने गाडी घेतात.
टू व्हीलर, फोर व्हीलर घेण्यासाठी नाममात्र डाऊन पेमेंट भरून आता सहज हफ्त्याने गाडी खरेदी करता येते. अनेक फायनान्स कंपन्या आता टू व्हीलर किंवा फोर व्हीलर घेण्यासाठी कर्ज ऑफर करत आहेत.
मात्र हफ्त्याने गाडी घेतल्यानंतर काही लोकांना हफ्ते फेडता येत नाहीत. काही कारणास्तव त्यांचे हफ्ते थकतात. मग फायनान्स कंपनी नोटीस बजावून अशा व्यक्तीकडून गाडी ओढून घेऊन जाते.
दरम्यान, आज आपण जर फायनान्स कंपनी गाडी ओढून घेऊन जात असेल तर तुम्ही काय केले पाहिजे, कायद्याने तुम्हाला काय अधिकार मिळतात ? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
फायनान्स कंपनी गाडी ओढून घेऊन जात असेल तर तुम्ही काय करू शकता
तुम्ही जर हप्त्याने गाडी घेतली असेल आणि काही कारणास्तव तुमचे हप्ते थकले असतील तर फायनान्स कंपनीला तुमची गाडी ओढून घेऊन जाण्याचा अधिकार आहे.
परंतु, फायनान्स कंपनी तुमचे हफ्ते थकल्यानंतर तीन महिन्यांनी म्हणजे सलग तीन हप्ते थकले असतील तेव्हाच तुमची गाडी ओढून घेऊन जाऊ शकते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे फायनान्स कंपनी तुमची गाडी सकाळी आठ ते सायंकाळी सात वाजेपर्यंतच्या कालावधीतच तुमची गाडी ओढून घेऊन जाऊ शकते.
सकाळी आठच्या आधी किंवा सायंकाळी सात वाजेनंतर कोणतीच फायनान्स कंपनी तुमची गाडी ओढून घेऊन जाऊ शकत नाही. फायनान्स कंपनी गाडीचा ताबा घ्यायला येत असेल तर कंपनीला तुम्हाला पझेशन नोटीस द्यावी लागते.
म्हणजेच कंपनी कोणत्या तारखेला आणि कोणत्या वेळी गाडी ताब्यात घेण्यासाठी येईल हे नोटीसद्वारे तुम्हाला कळवावे लागते.
फायनान्स कंपनीचा वसुली अधिकाऱ्याचा आदेश देखील सदर कंपनीकडून जारी केला जातो. यामुळे तुमची गाडी जर फायनान्स कंपनी ओढायला आली तर तुम्ही त्यांच्याकडून वसुली अधिकाऱ्याचा आदेश मागू शकता.