Blind Village : जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्यावर कानाने ऐकून आणि डोळ्याने पाहून देखील विश्वास ठेवता येणे अवघड आहे. जगातील अशा अनेक जगगावेगळ्या आणि अनोख्या गोष्टी आपल्याला नेहमीच पाहायला आणि ऐकायला मिळतात. दरम्यान, आज आपण जगातील आंधळ्यांच्या गावाची माहिती पाहणार आहोत.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात असेही एक गाव आहे जिथे सगळेजण आंधळे आहेत. माणसांपासून ते जनावरांपर्यंत या गावात सगळेजण आंधळे असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे या गावाला आंधळ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. मात्र या गावात सगळेजण आंधळे का आहेत? नेमकं याचे कारण काय आहे? हे गाव नेमके कुठे आहे याविषयी आता आपण माहिती पाहणार आहोत.
कुठे आहे आंधळ्यांचे गाव
मेक्सिको देशातील टिल्टपेक नावाचे गाव आंधळ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी प्राण्यांपासून ते माणसांपर्यंत सगळेजण दृष्टिहीन आहेत. या गावात झापोटेक जमातीचे लोक राहतात.
मीडिया रिपोर्ट नुसार या गावात नवीन मूल जन्माला आल्यानंतर ते मुल पाहू शकत. मात्र हे नवजात बालक काही दिवसांचे झाल्यानंतर त्याची दृष्टी जाते.
म्हणजेच या गावात मुले आंधळेचं जन्माला येत नाहीत तर जन्म झाल्यानंतर त्यांची दृष्टी जाते. प्राण्यांच्या बाबतीतही असेच घडत असावे असे म्हटले जाते.
सगळेजण आंधळे असण्याचे कारण काय
गावात एक दोन जण आंधळे असले तर काही नवल वाटण्यासारखे नाही. मात्र सर्व गावच आंधळ असेल तर साहजिकच आश्चर्य वाटणार आहे. माणसं तर सोडाच पण प्राणी देखील आंधळे आहेत. त्यामुळे नेमके या गावात असे काय घडते ज्यामुळे लोक आंधळे होतात असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की या गावाबाबत अशी एक आख्यायिका आहे की या गावात एक शापित वृक्ष आहे आणि या झाडाकडे कोणी पाहिले की तो आंधळा होत असतो.
दुसरीकडे तज्ञांनी या गावात एक विषारी माशी आढळते जी की मुलांना चावते आणि त्यामुळे त्यांची दृष्टी जाते असे म्हटले आहे.
खरंतर या गावाची मेक्सिकन सरकारला माहिती मिळाली. त्यावेळी सरकारने येथे तज्ञांची टीम पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र मेक्सिकन सरकारच्या टीमला गावकऱ्यांनी यामध्ये हस्तक्षेप करण्यास मनाई केली.