Bombay High Court Recruitment:- सध्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या विविध विभाग अंतर्गत अनेक भरती प्रक्रियेच्या नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले असून कित्येक दिवसांपासून विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा सुवर्णसंधीचा काळच म्हणावा लागेल.

यासोबतच बँकेच्या विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी देखील विविध बँकांच्या माध्यमातून अनेक रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. अगदी याच पद्धतीने जर आपण कोर्ट म्हणजेच न्यायालयाचा विचार केला तर मुंबई उच्च न्यायालयाच्या माध्यमातून देखील आता चौथी पास असलेल्या उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे

Advertisement

व त्याकरिता उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मुंबई हायकोर्टाच्या माध्यमातून राबविण्यात येणारी ही भरती सफाई कामगार या पदासाठी राबविण्यात येणार असून एकूण सहा रिक्त जागा भरण्यासाठी या भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयामध्ये सफाई कामगार या पदासाठी भरती

Advertisement

मुंबई उच्च न्यायालयाच्या माध्यमातून सफाई कामगार या पदाच्या सहा रिक्त जागांसाठी जाहिरात निघाली असून जे उमेदवार इच्छुक असतील त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे.

या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख
मुंबई उच्च न्यायालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणारी ही भरती करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 ही आहे.

Advertisement

अर्ज करण्याची पद्धत व अर्ज पाठवण्याचा पत्ता
या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑफलाइन अर्ज 10 एप्रिल 2024 पर्यंत करायचे असून अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने प्रबंधक( प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजी नगर-431009 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

उमेदवारांची निवड कशी केली जाईल?
या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करतील त्यांची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

Advertisement

नोकरीचे ठिकाण कोणते राहील?
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई राहणार आहे. म्हणजेच उमेदवारांची नियुक्ती मुंबई या ठिकाणी केली जाणार आहे.

अर्जदारासाठी आवश्यक वयोमर्यादा
या भरती करिता जे उमेदवार अर्ज करतील त्यांचे वय किमान 18 ते कमाल 38 वर्षे असणे गरजेचे आहे.

Advertisement

अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क
ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल त्यांना अर्ज फी म्हणून दोनशे रुपये भरावे लागतील.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पात्रता
1- मुंबई हायकोर्टामध्ये राबविण्यात येणाऱ्या सफाई कामगार या पदासाठीच्या भरती प्रक्रिया करिता उमेदवार इयत्ता चौथी पास असणे गरजेचे असून अर्जामध्ये त्यांनी चौथी मधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे.

Advertisement

2- उमेदवार चौथी उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च अहर्ता म्हणजेच दहावी, बारावी / पदवी प्राप्त असेल व त्याच्याकडे किंवा तिच्याकडे इयत्ता चौथीचे मार्कशीट नसेल तर उमेदवाराने अर्ज भरताना इयत्ता चौथी करिता काल्पनिकरित्या 50% गुणांची नोंद अर्जामध्ये शैक्षणिक अहर्ता या रकान्यामध्ये करणे गरजेचे आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना किती मिळेल पगार?
या भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना 16600 ते 52 हजार 400 रुपये प्रति महिना इतके वेतन दिले जाईल.

Advertisement

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक
या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *