Business Idea:- नोकऱ्यापेक्षा आता व्यवसायाकडे तरुणाईचा कल मोठ्या प्रमाणावर वाढला असून अनेक जण आता व्यवसाय करण्याचा विचार करतात. परंतु जेव्हा व्यवसाय करण्याचा विचार मनामध्ये येतो तेव्हा सगळ्यात अगोदर आपल्या डोक्यात येते की व्यवसाय कोणता करावा आणि एकदा व्यवसाय कोणता करावा हे निश्चित झाले की व्यवसायासाठी लागणारे भांडवल या दोन गोष्टींचा प्रामुख्याने व्यवसाय करण्याच्या अगोदर विचार केला जातो.

जर आपण आजकाल व्यवसायांची यादी पाहिली तर अनेक छोटे मोठे व्यवसायांची भली मोठी यादी तयार होईल. परंतु यामधून कमीत कमी गुंतवणुकीत चांगला पैसा मिळवून दिला अशा व्यवसायाच्या शोधात बरेच जण असतात.

Advertisement

त्यामुळे तुम्ही देखील जर अशा प्रकारच्या व्यवसायाच्या शोधात असाल तर आपण या लेखांमध्ये कमीत कमी गुंतवणुकीत सुरू करता येईल व चांगली मागणी असलेल्या  एका व्यवसायाची माहिती या लेखात बघणार आहोत व हा व्यवसाय म्हणजे मोबाईल साठी लागणारा टेम्पर्ड ग्लास बनवण्याचा व्यवसाय होय.

 टेम्पर्ड ग्लास बनवण्याचा व्यवसाय

Advertisement

आता आपल्याला माहित आहे की आज प्रत्येकाच्या हातात आपल्याला मोबाईल दिसून येतो. जेव्हाही आपण कितीही किमतीचा जरी मोबाईल विकत घेतला तर त्याआधी सगळ्यात अगोदर त्या मोबाईलच्या डिस्प्ले वर टेम्पर्ड ग्लास बसवण्याला प्राधान्य देतो.

विशेष म्हणजे आपण जेव्हा मोबाईल विकत घेतो तेव्हा त्या किटमध्ये मोबाईलसाठी आवश्यक सर्व बाबी असतात.परंतु टेम्पर्ड ग्लास मात्र आपल्याला बाहेरून विकत घ्यावा लागतो. त्यामुळेच हा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने चालणारा व्यवसाय आहे.

Advertisement

 टेम्पर्ड ग्लास बनवण्यासाठी आवश्यक साधने

तुम्हाला देखील टेम्पर्ड ग्लास बनवण्याचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर याकरिता तुम्हाला काही कच्चामाल लागतो. तसेच याकरिता तुम्हाला अँटी सॉक प्रोटेक्टर फिल्म आणि ऑटोमॅटिक टेम्पर्ड ग्लास मेकिंग मशीन खरेदी करणे गरजेचे आहे.

Advertisement

यामध्ये एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेले असते आणि एका विशिष्ट एप्लीकेशनच्या माध्यमातून ते काम करते आणि नंतर तयार झालेला टेम्पर्ड ग्लास पॅक करण्यासाठी व तो विकण्यासाठी तुम्हाला खास पॅकिंग साहित्य देखील खरेदी करणे गरजेचे असते.

 अगदी घरात कसा बनवू शकता तुम्ही टेम्पर्ड ग्लास?

Advertisement

तुम्ही मॉडर्न म्हणजेच प्रगत अशा टेम्पर्ड ग्लास मेकिंग मशीनची मदत घेऊन टेम्पर्ड ग्लास बनवणे अगदी सोपे आहे. या मशीन मध्ये एक सॉफ्टवेअर असते व ते त्यात इन्स्टॉल केलेले असते. या मशीनच्या साह्याने हा ग्लास बनवण्यासाठी तुम्हाला प्रथम टेम्पर्ड ग्लास शीट बसावे लागते व ते मशीन चालू करून तुमचा मोबाईल आणि लॅपटॉपला ते कनेक्ट करावे लागेल.

तसेच या मशीनचे एप्लीकेशन डाउनलोड करावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टेम्पर्ड ग्लास बनवता येतो. या एप्लीकेशनमध्ये तशा प्रकारची रचना करावी लागते जेणेकरून स्वयंचलित टेम्पर्ड ग्लास तयार होईल. त्यानंतर तयार झालेले ग्लास बाहेर काढून ते व्यवस्थित पॅक करून तुम्ही विक्रीसाठी त्यांना पाठवू शकतात.

Advertisement

 टेम्पर्ड ग्लास बनवण्यासाठी किती खर्च येतो?

व्यवसाय सुरू करण्याआधी तुम्हाला व्यवसायाची नोंदणी करावी लागेल. तसेच जर आपण मशीनचा विचार केला तर एक लाख रुपयापेक्षा कमी किमती तुम्हाला या संबंधीचे मशीन उपलब्ध होते त्यासोबतच काही आवश्यक किरकोळ खर्च पकडून तुम्ही दीड लाख रुपयापर्यंत कमी खर्चात  अगदी घरी बसून टेम्पर्ड ग्लास बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात.

Advertisement

साधारणपणे एक टेम्पर्ड ग्लास बनवण्यासाठी दहा ते पंधरा रुपये खर्च येतो. परंतु तयार टेम्पर्ड ग्लास बाजारात 100 ते दोनशे रुपये पर्यंत देखील विकला जातो. म्हणजेच शंभर रुपयाला एक टेम्पर्ड ग्लास जरी विकला गेला तरी 80 रुपयापर्यंत एका ग्लास मधून तुम्ही नफा मिळवू शकतात.

अशाप्रकारे तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीतून चांगला नफा देणारा हा व्यवसाय सुरू करू शकतात.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *