Canara Bank Home Loan : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याने सर्वसामान्य लोक गृह खरेदीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृह कर्जाचा पर्याय स्वीकारत आहेत. विशेष म्हणजे होम लोन घेणे काही अंशी फायदेशीर देखील ठरत आहे.
यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकार लोक आता सर्वसामान्यांना गृह खरेदीसाठी कर्ज घेण्याचा सल्ला देखील देत आहेत.
दरम्यान जर तुम्हीही गृह कर्जाचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की आज आपण कॅनरा बँकेच्या गृह कर्ज योजनेबाबत जाणून घेणार आहोत.
खरंतर कॅनरा बँकेकडून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी परवडणाऱ्या व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
दरम्यान, आज आपण कॅनरा बँकेकडून जर एखाद्या व्यक्तीने 40 लाख रुपयांचे होम लोन घेतले तर त्याला किती रुपयाचा मासिक हप्ता भरावा लागेल याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कॅनरा बँकेचे होम लोनवरील व्याजदर
मिळालेल्या माहितीनुसार, कॅनरा बँकेकडून ग्राहकांना किमान 8.40% या व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
ज्या लोकांचा सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक आहे अशा व्यक्तींना 8.40% या किमान व्याजदरात बँकेकडून गृह कर्ज पुरवले जात आहे. तथापि, ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोर यापेक्षा कमी आहे त्यांना अधिकचे व्याजदर द्यावे लागू शकते.
सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो. 750 पेक्षा अधिक सिबिल स्कोर असेल तर बँकेकडून कमी व्याजदर आकारले जाते.
40 लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास किती व्याज द्यावे लागेल जर एखाद्या व्यक्तीला कॅनरा बँकेकडून 8.40 टक्के या व्यायाचा तर आता 40 लाख रुपयांचे कर्ज 20 वर्षांच्या कालावधीसाठी मिळाले तर अशा व्यक्तीला 34 हजार 460 रुपये एवढा मासिक हफ्ता भरावा लागणार आहे.
या कालावधीत सदर व्यक्तीला 42 लाख 70 हजार 443 रुपयांचे व्याज भरावे लागणार आहे. म्हणजेच सदर व्यक्तीला वीस वर्षांच्या कालावधीत मूळ रकमेसहित 82 लाख 70 हजार 443 रुपये भरावे लागणार आहेत.