Car Bike Duplicate RC : तुमच्याकडेही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर आहे का ? हो ना मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष कामाची ठरणार आहे. खरे तर आपण जेव्हा नवीन वाहन खरेदी करतो तेव्हा त्या नवीन वाहनाची आरटीओ मध्ये नोंदणी करावी लागते. आरटीओच्या डेटाबेस मध्ये नवीन वाहन रजिस्टर करावे लागते.
जेव्हा आरटीओच्या डेटाबेस मध्ये नवीन वाहन रजिस्टर होत असते तेव्हा आरटीओच्या माध्यमातून वाहन नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते ज्याला वी आर सी किंवा आरसी देखील म्हणतात.
वी आर सी अर्थातच व्हेईकल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. जर तुम्ही आरसी नसलेले वाहन चालवत असाल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.
यामुळे तुमच्याकडे तुमच्या वाहनाचे आरसी असणे आवश्यक आहे. पण, अनेकांचे आरसी हरवते? अशावेळी सदर वाहन मालकाला अडचणींचा सामना करावा लागतो.
अशा परिस्थितीत आज आपण आरसी हरवल्यास काय केले पाहिजे, डुप्लिकेट आरसी साठी कसा अर्ज करता येईल याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
डुप्लिकेट आरसीसाठी अर्ज करण्याची प्रोसेस कशी आहे?
जर तुमच्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच आरसी हरवले असेल तर तुम्हाला डुप्लिकेट आरसी साठी अर्ज करावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे.
या अधिकृत वेबसाईटवर भेट दिल्यानंतर तुम्हाला ‘वाहन सेवा’वर स्क्रोल करायचे आहे आणि ‘डुप्लिकेट आरसी’ वर क्लिक करावे लागणार आहे. यानंतर मग तुम्हाला राज्य निवडायचे आहे.
नंतर वाहन नोंदणी क्रमांक एंटर करायचा आहे आणि RTO निवडायचा आहे. मग तुम्हाला डुप्लिकेट आरसी पृष्ठावर, नाव, पत्ता, संपर्क तपशील इत्यादी डिटेल्स अपलोड करावे लागेल.
नंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील. त्यानंतर, डुप्लिकेट आरसीसाठी पेमेंट करायचे आहे. ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी तुमच्या पत्त्यावर आरसी पाठवले जाणार आहे.